News Flash

नवऱ्यासोबत संबंध आहेत समजताच बहिणीला ऑफिसमध्ये जाऊन मारलं; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.

viral video of sister beating sister
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (फोटो:@59dallas/Twitter)

सोशल मीडियावर बरेच मजेदार व्हिडीओ आहेत परंतु हा व्हिडीओ पाहून तुम्हाला खरोखर आश्चर्य वाटेल. खरं तर, मुलाखत देण्यासाठी गेलेल्या एका मुलीने तिच्या बहिणीला ऑफिसमध्ये जाऊन मारलं आणि या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या पतीशी संबंध असल्याचे कळल्यावर तिने तिच्या  बहिणीला ऑफिसमध्ये जाणून मारहाण केली. तिची बहिण ऑफीमध्ये मुलाखत देण्यासाठी गेली होती तेव्हाच ही घटना घडली.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला

मुलीला मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की एक मुलगी ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून मुलाखत देत आहे. मग एक महिला त्या ऑफिसमध्ये प्रवेश करते आणि मुलीचे केस पकडून तिला खाली पाडते. यानंतर, ती मुलीच्या डोक्यावर मारू लागते.या दरम्यान, ऑफिसमध्ये उपस्थित लोक घटनास्थळी पोहोचतात आणि मुलीला निघून जाण्यास सांगतात पण ती महिला तिला सतत मारहाण करत राहते. डॅलस नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

मारहाणीचा व्हिडीओ गुप्तपणे केला रेकॉर्ड

असे सांगितले जात आहे की कार्यालयात उपस्थित असलेल्या कोणीतरी गुपचूप मुलीच्या मारहाणीचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ आतापर्यंत ४० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि ५६ हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. त्याचबरोबर १० हजारांहून अधिक लोकांनी रिट्विटही केले आहे.

(हे ही वाचा: रेल्वे ट्रॅकवर उभ्या असलेल्या महिलेचे वाचवले प्राण वाचण्यासाठी धावून आले महाराष्ट्र पोलीस)

वापरकर्त्यांनी अशा दिल्या प्रतिक्रिया

अनेक वापरकर्ते या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने सांगितले की, महिलेने तिच्या बहिणीला जेवढे निर्घृणपणे मारले आहे, तेवढेच तिने तिच्या पतीलाही मारले पाहिजे. यात तिच्या पतीचाही तितकाच दोष आहे. त्याचवेळी, दुसऱ्या वापरकर्त्याने सांगितले की, या मुलीला नक्कीच नोकरी मिळाली पाहिजे आणि तिला आरोग्य विमा मिळाला पाहिजे.

तुमचं काय मत आहे या घटनेवर?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2021 4:59 pm

Web Title: viral video women beaten her sister as she found out that she slept with her husband ttg 97
Next Stories
1 हत्तीने गणपती मंदिरात येऊन बाप्पाची पूजा केली! व्हिडीओ होतोय व्हायरल
2 रेल्वे ट्रॅकवर उभ्या असलेल्या महिलेचे प्राण वाचवण्यासाठी धावून आले महाराष्ट्र पोलीस
3 लाडक्या गणरायासमोर एसीपीही बेभान होऊन नाचतात तेव्हा…; व्हिडीओ व्हायरल!
Just Now!
X