News Flash

विंडिजच्या समुद्र किनारी रंगली विराट-अनुष्काची ‘बीच डेट’

विराटने स्वत: पोस्ट केला दोघांचा खास फोटो

विंडिजच्या समुद्र किनारी रंगली विराट-अनुष्काची ‘बीच डेट’

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ही ‘हॉट अँड फिट’ कपल आहे. ही जोडी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. विराट कोहली ज्यावेळी मैदानावर फटकेबाजी करत असतो, तेव्हा बहुतेक वेळी अनुष्का स्टेडिअममध्ये असते. आपल्या पतीला प्रोत्साहन देण्यासाठी ती कायम सज्ज असते. दुसरीकडे अनुष्काचे चित्रपट विराट आवर्जून बघतो आणि तिला आणखी चांगला अभिनय करण्यासाठा प्रोत्साहन देतो. पण सध्या ही जोडी विंडिजच्या बेटांवर एकमेकांसोबत वेळ घालवत आहे.

अनुष्काने आपल्या शूटिंग आणि व्यस्त वेळापत्रकातून सुटी घेतली असून ती भारताच्या संघाबरोबर विंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ती विराटसोबत वेळ घालवत आहे आणि विंडिजच्या समुद्र किनाऱ्यावर आनंद लुटत आहे. नुकताच तिच्या बिकिनीतील फोटोवर विराटने केलेल्या कमेंटमुळे चर्चेत आली होती. त्यानंतर आता आणखी एका फोटोमुळे हे दोघे चर्चेत आले आहेत.

भारताचा विंडिजविरूद्धचा पहिला कसोटी सामना २२ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्याआधी विराट कोहली याने आपली पत्नी अनुष्का हिच्यासोबत विंडिज बेटांवरील समुद्र किनाऱ्यावर बीच डेट एन्जॉय केली आहे. विराटने स्वत: दोघांचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये विराट आणि अनुष्का दोघेही एकदम ‘कूल’ अंदाजात दिसत आहेत. या फोटोबद्दल शब्दांत वर्णन करणं विराटने टाळले असून कॅप्शन म्हणून त्याने काही बोलक्या इमोजींचा वापर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

काही दिवसांपूर्वी विराटची पत्नी अनुष्का हिनेही विंडिज बेटांवर समुद्राच्या पाण्याचा आनंद लुटला. तिने तिचा एक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला होता. या फोटोत तिने बिकिनी घातली होती आणि ती समुद्र किनाऱ्यावर वाळूत बसून फोटोसाठी पोझ देताना दिसत होती.

 

View this post on Instagram

 

Sun kissed & blessed

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

अनुष्काच्या या ‘हॉट’ फोटोवर सर्व चाहत्यांनी कमेंट केल्या. पण या सर्व कमेंटमध्ये विराटची कमेंट सर्वात खास ठरली. विराटने तिच्या फोटोवर शब्दांनी व्यक्त न होता इमोजी टाकून आपले प्रेम आणि भावना व्यक्त केल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 1:54 pm

Web Title: virat kohli anushka sharma beach date virushka windies island special photo vjb 91
Next Stories
1 Dahi Handi 2019 : ‘या’ गाण्यांशिवाय अधुरी आहे कृष्णाष्टमी
2 मालकाचा मृत्यू; 15 मिनिटांत सोडले पाळीव श्वानानंही प्राण
3 VIDEO: जेव्हा संसदेच्या सभागृहात सभापतीच गे दांपत्याच्या बाळाला दूध पाजू लागतात
Just Now!
X