भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या घरी मुलीचं आगमन झाले आहे. ११ जानेवरीला विराट कोहली आणि अनुष्का आई-बाबा झाले. सोशल मीडियावरुन दोघांनी ही गोड बातमी दिली होती. विराट आणि अनुष्का दोघांनीही फोटोग्राफर्सना आमच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावू नका अशी विनंती केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच विराट आणि अनुष्का मीडियासमोर आले आहेत.
आई झाल्यानंतर अनुष्काने केली पहिलीच पोस्ट, म्हणाली…
आई-बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मीडियासमोर आले. मुंबईत दवाखान्यातून बाहेर पडल्यानंतर दोघांनीही फोटोग्राफर्ससाठी वेळ दिला. मुलीच्या जन्मानंतर विराट कोहली आणि अनुष्काने आपल्या बाळाचा फोटो काढू नका अशी फोटोग्राफर्सना विशेष विनंती केली होती. यावेळी अनुष्काने प्रायव्हसी दिल्याबद्दल फोटोग्राफर्सचे आभार मानले.
विशेष म्हणजे यावेळी विराट कोहलीच्या नव्या हेअरस्टाइलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. विराट कोहली क्रिकेटसोबतच त्याच्या लूकमुळेही चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. त्याची ही नवी हेअरस्टाइल चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 21, 2021 2:47 pm