14 December 2019

News Flash

Virat Kohli : विराटला एका इन्स्टाग्राम पोस्टचे किती पैसे मिळतात माहितीये?

आकडा ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

विराट कोहली ( संग्रहीत छायाचित्र )

क्रिकेटच्या मैदानात सातत्यपूर्ण खेळी आणि तिन्ही प्रकारात संघाच्या नेतृत्वाची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या विराट कोहली Virat Kohli हा देशातला श्रीमंत खेळाडू आहे. गेल्या महिन्यात फोर्ब्सनं जगभरातील श्रीमंत खेळाडूंची यादी जाहीर केली होती. त्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या दहा खेळाडूंमध्ये विराटचाही समावेश आहे. विराट हा सोशल मीडियावरही सर्वात लोकप्रिय क्रिकेटर आहे. इन्स्टाग्रामवर सक्रीय असणाऱ्या विराटचे १ कोटी ६७ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

अटकेत असलेल्या सौदी प्रिन्सची ‘ती’ राजकन्या मात्र वेगळ्याच कारणाने चर्चेत

विराटच्या प्रत्येक इन्स्टा पोस्टवर हजारो कमेंट आणि लाईक्सचा ‘पाऊस’ असतो. ‘झी न्यूज’ने दिलेल्या माहितीनुसार इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमुळे विराटला दिवसाला जवळपास तीन कोटींची कमाई होते. आपल्या पोस्टमधून एखाद्या ब्रँडला प्रसिद्धी द्यायची असेल तर विराट ३.२ कोटींच्या आसपास मानधन घेतो. जाहिरातीसाठीदेखील विराट सर्वाधिक मानधन घेतो. अनेक बडे क्रिकेटर्स जाहिरातीसाठी २ ते ४ कोटी मानधन घेतात, पण विराटच्या मानधनाचा आकडा यापेक्षाही मोठा आहे. तो पाच कोटींच्या आसपास मानधन घेतो, त्यामुळे जाहिरातींसाठी जास्त मानधन घेणाऱ्या व्यक्तींच्या यादीतही विराट अव्वल आहे. सध्याच्या घडीला विराट कोहलीची संपत्ती १४.५ मिलियन डॉलर असल्याचं फोर्ब्सनं म्हटलं आहे. कमाईच्याबाबतीत विराटने जगभरातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या लिओनेल मेस्सीलाही मागे टाकले आहे.

VIDEO : धुकं की धबधबा?, पाहा निसर्गाचा चक्रावून टाकणारा चमत्कार

 

First Published on November 8, 2017 3:31 pm

Web Title: virat kohli earns per instagram post will make your jaws drop
टॅग Virat Kohli
Just Now!
X