News Flash

नाप-तोल के…! विराट ठेवतोय जिभेवर कंट्रोल, अनुष्कानं शेअर केला व्हिडीओ

पाहा हा खास Video

करोनामुळे सध्या क्रिकेटचे सामने बंद आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू होण्याची शक्यता आहे, पण भारताचे मात्र ऑगस्ट महिन्यापर्यंतचे सर्व दौरे रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे सारेच खेळाडू घरात बसून कंटाळले आहेत. काही खेळाडू कंटाळा घालवण्यासाठी लाइव्ह चॅटचा आधार घेत आहेत, तर काही खेळाडू जुन्या आठवणींमध्ये रमताना दिसत आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हादेखील पत्नी अनुष्का शर्मासोबत निवांत वेळ घालवत आहे. पण त्याचसोबत तो त्याच्या तब्येतीची काळजी घेतानाही दिसत आहे.

विराट आणि अनुष्का हे एक ‘हॉट अँड फिट’ कपल म्हणून ओळखलं जातं. विराटच्या फिटनेसचा तर मोठा चाहतावर्ग आहे. सततचे क्रिकेट सामने आणि जिममधील वर्कआऊट असा दिनक्रम असलेल्या विराटसाठी तंदुरूस्त राहणं हेच महत्त्वाचं असतं. त्याने अनेकदा हे मुलाखतीत सांगितलंदेखील आहे. पण सध्या क्रिकेट सामने बंद आहेत, तसेच बाहेर जाण्यावरही निर्बंध आहेत. अशा परिस्थिती विराट आपल्या तब्येतीची काळजी घेत आहे. अनुष्काने नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. त्यात विराट मोजून-मापून जेवण जेवताना दिसला. अनुष्काचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून सध्या प्रचंड चर्चेत आहे.

पाहा तो व्हिडीओ-

दरम्यान, आजपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात होत आहे. इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी सामन्याने क्रिकेटचं कमबॅक होत आहे. पण भारतीय चाहत्यांना मात्र टीम इंडियाला मैदानावर पाहण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. कारण नजीकच्या काळात प्रशिक्षण शिबीर भरवलं जाणार नाही असं BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 1:59 pm

Web Title: virat kohli ensures measured eating in their house anushka sharma shares video vjb 91
Next Stories
1 फोटोत लपलेल्या ‘या’ पालीला तुम्ही शोधू शकता का?
2 इटलीमधील बर्फाचा रंग झाला गुलाबी तर अंटार्क्टिकात सापडला Green Ice; वैज्ञानिकही चक्रावले
3 तळण्यासाठी चूकून खाद्य तेलाऐवजी इंजिन ऑइल वापरलं; त्यानंतर असं काही झालं की…
Just Now!
X