News Flash

India’s 2019 Person of the Year : विराट कोहलीने पटकावला बहुमान

भारतीय कर्णधाराच्या शिरपेचात मानाचा तुरा

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. People for the Ethical Treatment of Animals (PETA) या संस्थेकडून २०१९ वर्षातला Person of the Year हा बहुमान विराटला मिळाला आहे. या कामगिरीसह विराटने आपली पत्नी अनुष्का शर्मा, सनी लिओनी, कपिल शर्मा या सेलिब्रेटींच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

PETA ही संस्था जगभरात मुक्या प्राण्यांविरोधात होणाऱ्या अत्याचाराविरोधात काम करते. कोहली गेल्या काही वर्षांमध्ये शाकाहरी झाला आहे. अनेकदा सोशल मीडियावर मुक्या प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोहलीने याविरोधात आवाज उठवला आहे. याव्यतिरीक्त PETA च्या अनेक उपक्रमांमध्ये विराट सक्रीय असतो.

विराट कोहलीच्या व्यतिरीक्त अनुष्का शर्मा, सनी लिओनी, कपिल शर्मा, सोनम कपूर, हेमा मालिनी, आर. माधवन, जॅकलिन फर्नांडिस या कलाकारांना हा बहुमान मिळाला आहे. विराट सध्या भारतीय संघासोबत २२ नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानात रंगणाऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी तयारी करतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2019 3:44 pm

Web Title: virat kohli named peta indias 2019 person of the year joins ranks of wife anushka sharma sunny leone psd 91
टॅग : Virat Kohli
Next Stories
1 VIDEO : राऊतच नव्हे, मोदींच्या तोंडीही मिर्झा गालिबचा शेर…
2 ‘मनसे’चे अमेय खोपकर म्हणतात, ‘हा शरद पवार स्टाइल गोल तुम्ही दोनदा पाहाल’
3 शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर शिवसेना ट्रोल
Just Now!
X