29 October 2020

News Flash

ये शाम मस्तानी ! विराट-अनुष्काचा रोमँटीक अंदाज पाहिलात का??

डिव्हीलियर्सने टिपला विरुष्काचा सुंदर फोटो

आयपीएलच्या तेराव्या हंगामात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आतापर्यंत बहारदार खेळ केला आहे. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मादेखील सध्या युएईत आहे. RCB च्या सामन्यांना अनुष्का स्टेडीअमवर हजेरी लावत असते. शुक्रवारी RCB ने डिव्हीलियर्सच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर राजस्थानवर मात केली. बुधवारी RCB चा पुढचा सामना KKR विरुद्ध होणार आहे. त्याआधी विराटने आपली पत्नी अनुष्कासोबत काही काळ घालवण्याचं ठरवलं.

विराटने आपली पत्नी अनुष्का शर्मासोबतचा एक रोमँटीक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अनुष्का शर्मा आई बनणार आहे. काही दिवसांपूर्वीच विराट आणि अनुष्काने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती. एबी डिव्हीलियर्सने विरुष्काचा हा सुंदर फोटो काढला आहे, ज्याला सोशल मीडियावर नेटकऱ्यांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

pic credit – @abdevilliers17

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

विराट कोहलीची यंदाच्या हंगामातली कामगिरी संमिश्र स्वरुपाची असली तरीही त्याने RCB चं कुशल नेतृत्व करत प्ले-ऑफच्या शर्यतीत संघाचं आव्हान कायम राखलं आहे. त्यामुळे यंदा विराट कोहलीचा RCB संघ आगामी सामन्यांमध्ये कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 10:34 pm

Web Title: virat kohli share his romantic picture with wife anushka fans like it psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 …अन् गावकऱ्यांना वाटलं एलियन आला
2 Viral Video : सिंहिणीची शिकार शूट करण्यासाठी घेतला गायीचा बळी
3 पुणे तिथे काय उणे! चक्क बस स्टॉपच गेला चोरीला, शोधून देणाऱ्याला मिळणार बक्षीस
Just Now!
X