News Flash

कर्जत-कसारा ! कसोटी मालिकेआधी विराटची सहकाऱ्यांसोबत मजा-मस्ती

भारत-न्यूझीलंड सराव सामना अनिर्णित

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आता न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी सज्ज झालेली आहे. २१ फेब्रुवारीपासून दोन्ही देशांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. टी-२० मालिकेत भारताने तर वन-डे मालिकेत न्यूझीलंडने बाजी मारल्यामुळे, कसोटी मालिकेत कोण विजय मिळवतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पहिल्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाने न्यूझीलंड एकादश संघाविरोधात ३ दिवसांचा सराव सामना खेळला. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी चांगला सराव करुन घेतला. सामना संपल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने आपला सहकारी पृथ्वी शॉ आणि गोलंदाज मोहम्मद शमीसोबत मजा-मस्ती करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

विराट-शमी आणि शॉच्या या आगळ्या-वेगळ्या लुकलाही नेटकऱ्यांनी चांगली पसंती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2020 3:57 pm

Web Title: virat kohlis drops naya post sundar dost pic with mohammed shami and prithvi shaw people love it psd 91
Next Stories
1 बोल्टचा विक्रम मोडणाऱ्या श्रीनिवासनची क्रीडामंत्र्यांनी घेतली दखल
2 शाहीद आफ्रिदीला पाचवं कन्यारत्न! नेटकऱ्यांनी दिला हा सल्ला..
3 “प्रेम शेअर करा पण…”; पुणे पोलिसांकडून ‘व्हॅलेंटाइन डे’ची टीप
Just Now!
X