करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात ३१ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केलं आहे. परिस्थिती पाहता हे लॉकडाउन वाढण्याचीही शक्यता आहे. या काळात प्रादूर्भाव अधिक वाढू नये यासाठी देशातील सर्व महत्वाच्या क्रीडा स्पर्धा बंद आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडूही या काळात घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. अनेक आजी-माजी खेळाडू या काळात सोशल मीडियावर गप्पा मारत, क्रिकेटच्या आठवणी ताज्या करणं, एकमेकांची मजा-मस्करी करणं असे प्रकार करत आहेत.

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहने लॉकडाउनमध्ये, व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला.

 

View this post on Instagram

 

Exercise Must

A post shared by Harbhajan Turbanator Singh (@harbhajan3) on

साहजिकच हरभजनच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगली पसंती मिळाली, चाहत्यांनी त्याचं कौतुकही केलं…मात्र भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने या व्हिडीओवर भन्नाट कमेंट करत सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत. पाहा काय म्हणाला कोहली….

दरम्यान, बीसीसीायने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होऊ शकतं…त्यामुळेच वर्षाअखेरीस आयपीएलचं आयोजन करता येईल का याची चाचपणी बीसीसीाय करत आहे. २९ मार्चपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार होती. मात्र देशात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता बीसीसीआयने ही स्पर्धा खबरदारीचा उपाय म्हणून १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. मात्र तोपर्यंतही परिस्थिती नियंत्रणात न आल्यामुळे बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत आयपीएल स्पर्धा स्थगित गेली.