01 March 2021

News Flash

‘वोग’ मासिकाच्या मुखपृष्ठावर सौदी राजकन्येचा फोटो, कट्टरतावादीयांची सडकून टीका

या देशात गाडी चालवण्यासाठी महिलांवर घालण्यात आलेली बंदी देखील अखेर उठवण्यात आली. या पार्श्वभूमीवर 'वोग' (अरेबिया ) मासिकानं मुखपृष्ठावर राजकन्येचा फोटा छापला.

प्रिन्सेस हायफा बिन्त अब्दुल्ला अल सौद हिचा फोटो 'वोग अरेबिया' मासिकाच्या मुखपृष्ठावर छापला.

सौदी अरेबिया कट्टर देश म्हणून ओळखला जातो, पण या देशात हळूहळू बदलाचे वारे वाहत आहे. क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे  देशात बदल घडवू पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच सिनेमागृहावरची बंदी उठवण्यात आली. देशात सिनेमागृह सुरू झाले, नुकताच येथे महिलांसाठी फॅशन शोदेखील पार पडला. गाडी चालवण्यासाठी महिलांवर घालण्यात आलेली बंदी देखील उठवण्यात आली.

या पार्श्वभूमीवर ‘वोग’ मासिकानं प्रिन्सेस हायफा बिन्त अब्दुल्ला अल सौद हिचा फोटो ‘वोग अरेबिया’ मासिकाच्या मुखपृष्ठावर छापला. आलिशान गाडीत ड्रायव्हर सीटवर बसलेल्या हायफा यांचा फोटो आणि वोगचं मुखपृष्ठ चर्चेचा विषय ठरला आहे. पहिल्यांदाच सौदी राजघराण्यातील महिलेला अशा रुपात दाखवण्यात आलं आहे. खरं तर हा बदल कौतुकास्पद आहे पण यामुळे सौदीतील वातावरण मात्र तापलं आहे. अनेकांनी या मासिकावर कडा़डून टीका केली आहे. सौदी अरेबियामधली पुरूषप्रधान संस्कृती नष्ट व्हावी व महिलांना गाडी चालवण्यासारखे हक्क मिळावेत यासाठी अनेक संस्था प्रयत्नशील आहेत. अशा संघटनांच्या 11 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्नशील असलेल्या संस्थांनी या मासिकाच्या विरोधात कडक शब्दांमध्ये टीका केली आहे, असे वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिले आहे.

हे मासिक सौदीमधील महिलांचे खरे प्रश्न लोकांसमोर आणण्याऐवजी भलत्याच विषयाला ग्लॅमरस रुप देण्याचा प्रयत्न करत आहे अशा शब्दात मासिकावर टीका करण्यात आली आहे. या देशातील काही लोक बदल घडवण्यात आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि एक महिला म्हणून माझा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे अशी प्रतिक्रिया देत हायफा यांनी विरोधकांच्या मानसिकतेवर सडकून टिका केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 5:51 pm

Web Title: vogue arabia cover featuring saudi princess in driving seat spark controversy
Next Stories
1 गोविंदा स्टाईल डान्स करुन धमाल उडवणाऱ्या काकांची ओळख पटली, दुसरा व्हिडीओही आला समोर
2 जाणून घ्या ‘दख्खनच्या राणी’बद्दल ५ रंजक गोष्टी
3 प्रतिष्ठित ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेवर पुन्हा एकदा भारतीय मोहोर!
Just Now!
X