गरीब शेतक-यांची सगळीकडे परिस्थिती सारखीच असते. बलाढ्य कंपन्या आणि सरकार त्यांच्यासाठी काहीच करायला तयार होत नाही, त्यांच्या गरिबीचा फायदा उठवणारे अनेक आहेत. चीनमधल्या अशाच एका बलाढ्य केमिकल फॅक्टरीने युशूतून गावातील नद्यामंध्ये रसायनयुक्त पाणी सोडायला सुरुवात केली. यामुळे शेतीचे मोठे नुकसान होऊ लागले. रसायनांमुळे शेतजमीनी नापिक झाल्यात. गेल्या काही वर्षांत पीकही उगवेनासे झाले. त्यामुळे गावक-यांनी याची लेखी तक्रार केली. पुढे हे प्रकरण न्यायालयात गेले. याच रासायनिक फॅक्टरीमुळे आपल्या शेतीचे नुकसान झाले आहे हे मात्र त्यांना न्यायालयात सिद्ध करता आले नाही.

viral video : महिलेने क्षुल्लक कारणासाठी गर्भवती महिलेची वाट रोखून धरली

आपली बाजू न्याय आहे. समोर असलेला शत्रू बलाढ्य आहे हेही या शेतक-यांना माहिती होते. गावक-यांच्या हक्कासांठी लढावे म्हणूनच या खेड्यातील शेतकरी वांग यांनी पुढाकार घेतला. मुळात गरीब कुटुंबात जन्माला आल्याने वांगचे शिक्षण झाले नव्हते. गरिबांना मदत करणार कोण? हा प्रश्न या शेतक-यांसमोर होता. म्हणूनच वांग यांनी स्वत: शिक्षण घेतले. गरीब कुटुंबात जन्माला आले असल्याने खायलाही पैसे नव्हते त्यात कायद्याच्या शिक्षणासाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे होताच. पण वांग यांनी हार मानली नाही. त्यांनी सार्वजनिक ग्रंथालयात जाऊन पुस्तकांचा अभ्यास केला. अनेक महत्त्वाचे मुद्दे लिहून घेतले. शेतक-यांना न्याय मिळावा यासाठी १६ वर्षे त्यांनी अभ्यास केला. या शेतक-यांनी पुन्हा एकदा खटला दाखल केला. याची पहिली सुनावणी त्यांनी जिंकली. वांगमुळे आपल्याला नक्कीच न्याय मिळेल अशी गावक-यांना आशा आहे.