टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली लॉकडाउनपश्चात आपला पहिला आंतरराष्ट्रीय दौरा खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. २७ नोव्हेंबरपासून भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माला या दौऱ्यात सुरुवातीला दुखापतीमुळे स्थान देण्यात आलं नव्हतं. परंतू कर्णधार विराट कोहलीने पत्नी अनुष्काची बाळंतपणात काळजी घेण्यासाठी भारतात परतण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहितला कसोटी संघात स्थान मिळालं आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर हँडलवर रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये बाहेरील देशांत चांगली कामगिरी करेल याची खात्री देता येत नाही असं वक्तव्य केलं होतं.

ब्रॅड हॉगच्या या वक्तव्यावर मुंबईचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफरने हेरा फेरी या चित्रपटातलं मिम वापरत उत्तर दिलं आहे. पाहा काय म्हणाला जाफर…

रोहित शर्मा सध्या बंगळुरुत NCA मध्ये सराव करतो आहे. कसोटी मालिकेदरम्यान रोहित ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहे.