News Flash

Video : भररस्त्यात चहलचे गाल ओढणारी ती तरूणी कोण?

फिरकीपटू युझवेंद्र चहलचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे...

करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास ७८ हजार लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडास्पर्धा रद्द झाल्या आहेत.

“तोंडावर खरं बोलणारी माणसं कोणालाच आवडत नाहीत…”; माजी मुंबईकर क्रिकेटपटूचं सडेतोड मत

भारतात धर्म मानल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धादेखील काही काळ स्थगित करण्यात आल्या असून IPL चे आयोजन लांबणीवर ढकलण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आणि सावधनता बाळगण्याचा सल्ला देत आहेत. पण भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल मात्र सध्या वेगळ्याच विश्वात आहे. क्रिकेट स्पर्धा बंद असल्याने गेले काही दिवस चहल टीकटॉक वर बराच active असल्याचे दिसत आहे. यात दरम्य़ान त्याने नुकतीच पोस्ट केलेली एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाली आहे.

IPL 2020 रद्द झाल्यास कोणाला बसणार किती कोटींचा फटका?

युझवेंद्र चहलने आपल्या टीक-टॉक अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केली आहे. त्या व्हिडीओमध्ये चहल आणि एक तरूणी रस्त्याने चालताना दिसतात. चालता चालता चहल रस्त्यावर बसतो आणि बुटाची लेस बांधतो. त्याचं लक्ष बुटाच्या लेसकडे असल्याचे पाहून ती तरूणी त्याच्याशी थोडासा लपंडाव खेळते. जेव्हा चहल तिची ही मस्ती बघतो तेव्हा तो तिला मस्करीत मारण्यासाठी हात उचलतो, त्यावेळी ती मुलगी भररस्त्यात चहलचे गाल ओढते आणि पळून जाते.

IPL नंतर डीव्हिलियर्स पुन्हा आफ्रिकेकडून खेळणार?

चहलचे गाल ओढणारी आणि त्याच्याशी मजा-मस्ती-धमाल करणारी ही तरूणी नक्की कोण आहे? हे समजू शकलेले नाही. पण या आधी या मुलीसोबत चहलचा व्हिडीओ किंवा कोणताही फोटो नसल्याने ही तरूणी कोण याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 4:41 pm

Web Title: watch girl pull cheeks of team india spinner yuzvendra chahal in tik tok video who is that girl vjb 91
Next Stories
1 करोनाचा फटका WWE लाही; रिकाम्या खुर्च्यांसमोर खेळाडूंची रेसलिंग
2 “तोंडावर खरं बोलणारी माणसं कोणालाच आवडत नाहीत…”; माजी मुंबईकर क्रिकेटपटूचं सडेतोड मत
3 CoronaVirus : BCCI चे अध्यक्ष फावल्या वेळात काय करत आहेत बघा…
Just Now!
X