सापाशी जन्मजात शत्रुत्व असलेला प्राणी म्हणजे मुंगूस. कोणत्याही विषारी सापाला मारण्याचं कौशल्य मुंगूसाकडे असतं. जंगल बुकसारख्या पुरस्तकांमधूनही साप आणि मुंगुसामधील वैर दाखवण्यात आलं आहे. आपल्याला लहानपणापासून या दोघांचं वैर असल्याचं गोष्टींच्या माध्यमातून सांगण्यात येतं. मात्र खरोखर या दोघाचं वैर कसं असतं यासंदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

आयएफएस अधिकारी असणाऱ्या सुशांत नंदा यांनी ट्विटवर साप आणि मुंगूस यांच्यामधील झुंजीचा एका व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक कोब्रा साप मुंगुंसाचा चावा घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र मुंगूंस आपल्या चपळतेने त्यापासून स्वत:चा बचाव करतो. अगदी काही क्षणांची चपळता दाखवल्याने मुंगुसाचे प्राण वाचतात. हा व्हिडिओ पोस्ट करताना सुशांत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “क्षणात त्याने कोब्रा आणि मृत्यूला चकवा दिला. मुंगुसं खूप चौकस असल्याने स्वत:चा जीव वाचवू शकतात. ते आपल्या शेपटीचा रबरासारखा वापर करुन बचावसाठी हवेत उडी मारून सापाला चकवा देतात.”

काही ठरावीक जातीची मुंगुसं आपल्या शेवटी जवळ असलेल्या पिशवीतून काळ्या-पांढऱ्या रसायनाचा फवारा सोडतात. हे रसायन म्हणजे मिथाईल किंवा ब्युटाईल थायोलसारखं गंधकाचा अंश असलेलं रसायन असतं. या रसायनाला कुजकं लसूण आणि जळणारा रबर अशा मिश्रणासारखा दरुगध येतो. हे रसायन शरीरातून सोडण्याआधी मुंगूस आपल्या शत्रूला तशी सूचना देतं. पाय आपटून किंवा गुरगुरून आपण तो भयानक वास सोडत असल्याची सूचना देऊनही शत्रू पक्ष बधला नाही तर मुंगूस स्वसंरक्षणाचं आपलं हत्यार बाहेर काढतं. स्पिटिंग कोब्राप्रमाणेच मुंगूस त्याच्यापासून चार मीटर अंतरावर असलेल्या प्राण्यावर या रसायनाचा अचूक मारा करू शकतं. ज्या वाटेवर हे रसायन मारलं असेल तिथला तो विशिष्ट वास पुढे कित्येक दिवस तसाच राहतो.