ऑस्ट्रेलिया हा देश कांगारुंचा देश म्हणून ओळखला जातो. ऑस्ट्रेलियामध्ये आढळणाऱ्या कांगारुंबद्दल जगभरातील अनेक देशांमधील प्राणी प्रेमींना आकर्षण असतं. मात्र तेथील स्थानिकांना कांगारुंबद्दल फारसं आकर्षण वाटतं नाही. अनेकदा तर कांगारु मानवी वस्तीमध्ये दिसून येतात. असाच काहीसा प्रकार नुकताच घडला एका फुटबॉल सामन्यादरम्यान. तसे कांगारु हे त्यांच्या खोड्यांसाठी ऑस्ट्रेलियातील स्थानिक वृत्तपत्रांमध्ये कायमच चर्चेत असतात. मात्र यंदा मैदानात प्रवेश केलेल्या कांगारुंचा व्हिडिओ समोर आला असून तो व्हायरल झाला आहे.

नक्की पाहा >> Video : जंगलामध्ये सेल्फी काढत असतानाच मागून अस्वल आलं आणि…

कांगारु हे खूप शक्तीशाली आणि लवकरच चिडणाऱ्या प्राण्यांपैकी एक आहेत. अनेकदा त्यांना आडवण्याचा, त्यांच्या वाटेत येण्याचा प्रयत्न केल्यास ते माणसावर हल्लाही करु शकतात. ते दिसायला गोंडस असले तरी चिडल्यावर ते पायांनी जोरदार ठोसा लगावतात हे अनेक व्हिडिओमधून समोर आलं आहे. अनेकदा हे कांगारु कोणाच्या शेतातून तर कधी रस्त्यावरुन उड्या मारत इकडून तिकडे जाताना नजरेस पडतात. मात्र नुकत्याच एका स्थानिक फुटबॉल सामन्यादरम्यान कांगारु थेट मैदानात दाखल झाले. या घटनेचा व्हिडिओ फुटबॉल क्लबनेच शेअर केला आहे.

फोटोगॅलरी  >>  एकमेवाद्वितीय! भारतामध्ये पहिल्यांदाच आढळला ‘हा’ सुंदर प्राणी; पाहून व्हाल थक्क

झालं असं की न्यू साऊथ वेल्स येथे दोन स्थानिक संघांमध्ये ऑस्ट्रेलियन फुटबॉल लिग स्पर्धेअंतर्गत सामना सुरु होता. या सामन्यादरम्यान अचानक दोन मोठ्या आकाराचे कांगारु मैदानात दाखल झाले. उड्या मारत हे कांगारु खेळाडूंमधून पळू लागले. सामना पाहण्यासाठी उपस्थित असणाऱ्या शॅरी कास्टलॅरी यांनी मैदानावर आलेल्या कांगारुंचा व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन फुटबॉल लिगच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन म्हणजेच @AFL वरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. “स्थानिक आनंदाने उड्या मारत आहेत,” या कॅप्शनसहीत एएपएलने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हे कांगारु काही वेळानंतर मैदानामधून निघून गेले. मात्र त्यांना पळवून लावण्यासाठी खेळांडूना फुटबॉलऐवजी थोडा वेळ त्यांच्याच मागे पळावे लागल्याचे चित्र पहायला मिळालं. या पूर्वीही अशाप्रकारे कांगारुचे व्हिडिओ व्हायरल झाल्याचे पहायला मिळालं होतं. मागील वर्षी दोन कांगारु भर रस्त्यामध्ये वाद घालताना दिसले होते.