News Flash

VIDEO : असा साजरा झाला भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन

भारताचा ६९ वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा होतो आहे. याच दिवशी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून भारत

छाया सौजन्य: सोशल मीडिया

भारताचा ६९ वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा होतो आहे. याच दिवशी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून भारत नावारुपाला आला. पण देशाचा पहिला प्रजासत्ताक दिन कसा साजरा झाला असेल असा कधी तुम्हाला प्रश्न पडला का? २६ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी गव्हर्नमेंट हाऊसच्या दरबार हाऊसमध्ये पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. १९५०, १९५२ साली साजरा झालेल्या प्रजासत्ताक दिनाचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ एका युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आले आहेत.

६ मिनिटे २८ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि इतर काही अधिकारी पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे सैन्यदल आणि रणगाड्यांचे प्रात्यक्षिके पाहायला मिळत आहेत.

(व्हिडिओ सौजन्य- युट्यूब)

तर आणखी एका व्हिडिओत लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये कशाप्रकारे प्रजासत्ताक दिन साजरा झाला हे पाहायला मिळत आहे. यामध्ये भारताचे ब्रिटनमधले पहिले उच्चायुक्त व्ही. के. कृष्ण मेनन पुन्हा एकदा शपथ घेऊन भाषण देत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2018 8:59 pm

Web Title: watch india s first republic day celebration in 1950 video
Next Stories
1 खडतर तैलबैला सर करत नऊ मुलींनी तीन हजार फुटांवर फडकवला तिरंगा
2 Viral Video : सौंदर्यस्पर्धेत मॉडेलच्या मुकुटानं घेतला पेट, मॉडेल सुदैवानं बचावली
3 नेटकऱ्यांनी असा साजरा केला हसरा प्रजासत्ताक दिन…
Just Now!
X