करोना व्हायरसमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कित्येक जणांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. हातातील नोकरी गेल्यामुळे अनेकावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अनेकांनी मिळेल ते काम करायला सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पिंपरीतील कोथिंबीर विक्रेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो नेमका आहे तरी कोण अशी चर्चा नेटकरी करत होते. तो नेमका कोण आहे त्यावरून पडदा उठला आहे.

“कोथिंबीर घ्या.. कोथिंबीर घ्या.. १४ रुपये.. १४ रुपये..” अशी आरोळी देऊन कोथिंबीर विकणारा व्यक्ती एक मराठी अभिनेता असून त्याचं नाव रोशन शिंगे असं आहे. रोशनने आपल्या इन्स्टाग्रामवर कोथिंबीर विकतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. नाचत आणि गात तो आपल्याच अंदाजात कोथिंबीर विकत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Kothimbir 14rupay#coryparker #punekar #chalahavyeuday #marathimuser #marathiactor #zmarathi #9xjakas

A post shared by Roshanshinge (@roshanshinge25) on

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना रोशन शिंगे म्हणतो की, ‘माझं कौशल्य लॉकडाउनमुळे वाया जाऊ नये असं वाटते. मला सध्या पैशांची गरज असल्यामुळे जे हाताला मिळेल ते काम मी करत आहे. अभिनय कौशल्याचा वापर मी भाजी विकण्यासाठी केला. बाजारातील वाढती गर्दी पाहून मी घरोघरी जाऊन भाजी विकण्याचा निर्णय घेतला आहे.’

रोशन शिंगे Raghu 350 या चित्रपटात काम करत आहे. १९ मार्चपासून या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार होतं. पण, काही कारणास्तव ते २२ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आलं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च पासून देशात लॉकडाउनची घोषणा केली. त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग रद्द करावे लागलं. गेल्या तीन महिन्यापासून काही काम नसल्यामुळे रोशनने अखेरीस भाजी विकण्याचा निर्णय घेतला.