26 February 2021

News Flash

Video: संसाराला हातभार म्हणत लग्नमंडपात मित्रांनी असं काही गिफ्ट दिलं की नववधूला हसू झालं अनावर

बऱ्याच विचारानंतर मित्राला ही भेटवस्तू देण्याऱ्या मित्रांच्या कल्पकतेला नेटकऱ्यांनी दाद दिलीय

खरं तर लग्नासारख्या खास दिवशी कायम लक्षात राहील अशी काय भेटवस्तू द्यावी हा अनेकांसमोर मोठा प्रश्न असतो. मात्र याच कायम लक्षात राहणाऱ्या भेटवस्तूच्या शोधात असणाऱ्या तामिळनाडूमधील एका मित्रांच्या ग्रुपने आपल्या मित्राला लग्नाची अशी काही भेटवस्तू दिलीय की तिची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु झालीय. नवदांपत्याला आश्चर्याचा धक्का देण्यासाठी नवऱ्याच्या मित्रांनी लग्नमंडपामध्ये सुखीसंसाराला हातभार लावण्यासाठी चक्क घरगुती गॅस सिलिंडर आणि पेट्रोलचा छोटा ड्रम भेट दिलाय. मित्रांनी दिलेलं हे भन्नाट गिफ्ट पाहून नेटकरी फार इम्प्रेस झालेत. देशभरामध्ये गॅसचे आणि इंधनाचे दर झापट्याने वाढत असताना हे महागडे गिफ्ट देणाऱ्या मित्रांचं कौतुक होताना दिसत आहे.

तामिळनाडूची राजधानी असणाऱ्या चेन्नईमधील एका लग्नामध्ये बराच विचार करुन मित्राला ही भेटवस्तू देण्याऱ्या मित्रांच्या कल्पकतेला नेटकऱ्यांनी दाद दिली आहे. या लग्नातील इतर काही पाहुण्या मंडळींनी नवदांपत्याच्या गळ्यात चक्क कांद्याच्या माळा घालून त्यांना अनोखी भेट दिलीय. हा लग्नातील व्हिडीओ सोध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतोय. ही भन्नाट गिफ्ट पाहून मंचावर उभे असणारे नवदांपत्य न थांबता हसताना दिसतेय.

नेटकऱ्यांनाही यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात.

१) गोंडस गिफ्ट

२) महागडं गिफ्ट

३) सर्वात महाग गिफ्ट

४) कल्पना छान पण सावध राहा

५) मौल्यवानच

६) गिफ्ट पाहून असं झालं

७) हसू अनावर

८) मौल्यवानच म्हणावं लागेल

९) तामिळ लोकांचा स्वॅगच वेगळा

१०) हुशार लोकं

एकंदरितच अनेकांना ही कल्पना आवडली असून हा व्हिडीओ पाहून एखाद्या लग्नात खरोखर असा महागडी भेट मिळाल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही हे मात्र नक्की.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2021 6:46 pm

Web Title: watch newlyweds in tamil nadu receive gas cylinder petrol as wedding gift scsg 91
Next Stories
1 …छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासही चुकीचा ठरवला! विरेंद्र सेहवागचा मानाचा मुजरा
2 Video: चाकांऐवजी ब्लेडवर चालणारी सायकल… ही भन्नाट सायकल कोणी आणि का बनवलीय जाणून घ्या
3 Video : 3000 डायनामाइट लावून ‘धोकादायक’ Trump Plaza केला जमीनदोस्त, पत्त्यांप्रमाणे कोसळली टोलेजंग इमारत
Just Now!
X