News Flash

अन् पाकिस्तानच्या पत्रकाराने गाढवावरून केलं रिपोर्टिंग

तुम्हाला चांद नवाब आठवतोय का?

आपल्या वेगळ्या रिपर्टिंगमुळे जगभरात चर्चेचा विषय ठरलेला पाकिस्तानचा रिपोर्टर चांद नवाब तुम्हाला नक्की आठवत असेल. एका वाक्यसाठी वारंवार टेक घेणाऱ्या चांद नवाबनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. चांद नवाबनंतर पाकिस्तानचा आणखी एक पत्रकार सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरतोय. विशेष म्हणजे या पत्रकारानं चक्क गाढवावर बसून रिपोर्टिंग केलं आहे.

अमीन हाफिज असे त्या पत्रकाराचे नाव आहे. लाहोर येथे तो कार्यरत आहे. सध्या सोशल मीडियावर अमीन यांचा गाढवावर रिपोर्टिंग केलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. पाकिस्तानमधले प्रसिद्ध पत्रकार हामिद मीर यांनी हा गमतीशीर व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

पाकिस्तानमधल्या जिओ न्यूज या वृत्तवाहिनीनं गाढवांच्या वाढत्या संख्येवर एक विशेष वृत्तांत तयार केला. त्यासाठी अमीन हाफिज यांनी गाढवावर बसून रिपोर्टिंग केले आहे. गाढवावर बसून रिपोर्टिंग करणारे हाफिज यादरम्यान खालीदेखील पडले.

Next Stories
1 शेगाव कचोरी झाली ६८ वर्षांची
2 साधेपणा… महापौर झाल्यानंतरही त्या घरोघरी जाऊन करतात दूध विक्री
3 ट्विट केलेल्या या फोटोमुळे डोनाल्ड ट्रम्प झाले ट्रोल, जाणून घ्या कारण
Just Now!
X