पुरामध्ये किंवा अगदी दूर्गम भागांमध्ये अडकलेल्या व्यक्तींना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही या पूर्वी पाहिले असतील. मात्र स्वित्झर्लंडमधील एका शेतकऱ्याने चक्क स्वत:च्या गायीला एअरलिफ्ट केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. आलप्स पर्वतांमधून या गाईला हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे दिसत आहे. एबीसीने दिलेल्या वृत्तानुसार शेतकऱ्याच्या गायीच्या पायाला जखम झाली होती. त्यामुळे तिला डोंगराळ भागामधून चालत पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये नेल्यास जखम आणखीन गंभीर होऊ शकते अशी शक्यता असल्याने शेतकऱ्याने गायीला एअरलिफ्ट करण्याचं ठरवलं.

सर्वच सोशल नेटवर्किंग साईटवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेकजण या गायीला एअरलिफ्ट करणाऱ्या शेतकऱ्याचे कौतुक करत आहेत. तर काहींनी मात्र गायीसंदर्भात वक्तव्य करताना मजेदार कमेंट केल्या आहेत.

१) छान काम केलं अनेकांनी तर…

२) हा तर साहसी खेळ

३) हा व्हिडिओ पाहून

४) गाय म्हणत असेल

५) गाय एवढी शांत कशी राहिली?

६) हा देशच असा आहे

७) ती एकदम शांत आहे

८) खरं प्रेम

९) ट्रकचा वापर का नाही केला?

१०) चित्रपट आठवला

एकंदरितच हा व्हिडिओ पाहून अनेकांना अनेक प्रश्न पडल्याचे दिसत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करुन नक्की कळवा.