16 January 2021

News Flash

Video : अरे यार…मत करो, घरात केस कापून घेणाऱ्या या लहानग्याला पाहुन तुम्हालाही आठवतील बालपणाचे दिवस

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

लहान असताना सलून मध्ये जाऊन केस कापणं हे आपल्या प्रत्येकासाठी एक दिव्य असायचं. लॉकडाउन काळात अनेकांनी घरातच केस कापून विविध पद्धतीने हेअरस्टाईल केल्या होत्या. सध्या अनलॉकच्या काळात देशभरात सलूनची दुकानं सुरु झालेली असली तरीही अनेक जणं अजुनही धोका नको म्हणून घरातचं केस कापण्याला प्राधान्य देतायत. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ व्हायरल होतोय…ज्यात वडिल आपल्या मुलाचे घरात केस कापत आहेत.

या व्हिडीओत हा मुलगा केस कापताना अतिशय वैतागलेला दाखवला आहे. बाबा केस कापत असताना, अरे यार…मत करो. ज्यादा क्यू कर रहे हो? अशा गोड आणि लाघवी आवाजात आपल्या वडिलांवर रागावताना दिसत आहे. अनुश्रृत असं या छोट्या मुलाचं नाव असून त्याच्या वडिलांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही तितक्याच गोड शब्दांत या मुलाच्या निरागसतेचं कौतुक केलंय.

काही तासांमध्येच या व्हिडीओला सोशल मीडियावर लाखो नेटकऱ्यांनी आपली पसंती दर्शवली आहे. काय मग, या छोट्या मुलाचे प्रेमात पाडणारे नखरे पाहून तुम्हालाही लहानपणाचे दिवस आठवले असतील ना??

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2020 8:11 pm

Web Title: watch toddler protests and threatens while getting a haircut from his father at home psd 91
Next Stories
1 आता करोना संसर्गाची चिंता सोडा; खास ‘फिजिकल डिस्टसिंग ड्रेस’ पाहून व्हाल आवाक्
2 Video : न्यूझीलंडच्या खासदारानं संस्कृतमध्ये घेतली शपथ
3 गगन भरारी! मुंबईतल्या बीडीडी चाळीतली सुवर्णा आता ‘नासा’ची कर्मचारी
Just Now!
X