07 March 2021

News Flash

VIDEO: …अन् धोनी म्हणाला, ‘पापा नको पण अश्रू आवर’

हा व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे

धोनी

महेंद्रसिंग धोनी हे नाव जगभरातील क्रिकेट रसिकांच्या परिचयाचे आहे. अनेकजण धोनीला पाहण्यासाठी मैदानात गर्दी करतात. मागील काही महिन्यांमध्ये तर काही चाहत्यांना मैदानातील सुरक्षाकडे भेदून थेट मैदानात येत धोनीचे पाय धरल्याचे प्रकारही घडले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटामध्ये धोनीची प्रचंड क्रेझ आहे. लहान मुलेही अनेकदा धोनीबरोबर सेल्फी काढताना कॅमेरात टिपली गेली आहेत. असे असतानाच एक छोट्या चाहत्याने मात्र धोनी त्याला कडेवर उचलून घेण्यास तयार असताना चक्क नकार दिला. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेचा विषय ठरत आहे.

झालं असं की काही दिवसांपूर्वी धोनी मुंबईमध्ये होता. जुहू येथील एका स्पोर्टस क्लबसाठी तो चॅरेटी फुटबॉल समान्यामध्ये सहभागी झाला होता.

 

View this post on Instagram

 

#dhoni #armaanjain #bunty #dinomoria #aparshaktikhurana Plying football @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

सामना संपल्यानंतर मैदानातून निघताना काही चाहत्यांना धोनी भेटला. या चाहत्यांमध्ये एका छोट्या मुलाचाही समावेश होता. त्या सर्वांची भेट झाली तेव्हा धोनीने त्या मुलाला उचलून कडेवर घेण्याचा प्रयत्न केला असता मुलाने नकार दिला. धोनीने अगदी हात पुढे करुन त्या मुलाला, ‘येणार का कडेवर?’ असा प्रश्नही विचारला. मात्र त्या मुलाने धोनीला नकार देत रडण्यास सुरुवात केली. त्या मुलाच्या नातेवाईकांना मुलाला धोनीकडे जाण्यास सांगितले. मात्र धोनीनेच ‘रडवू नका त्याला जाऊ द्या’ म्हणत तेथून काढता पाय घेतला. पुढे जाऊन गाडीत बसण्याआधी धोनीने इतर चाहत्यांबरोबर फोटो काढले. मात्र धोनीने स्वत:हून उचलून घेण्याची ऑफर दिली असताना ती नाकारणाऱ्या या मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

Lil kid says no to #msdhoni

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 7:18 pm

Web Title: watch video a kid denies to hug ms dhoni
Next Stories
1 या कारणासाठी GUCCI हजारो रुपयांना विकतंय मळलेले बूट
2 ज्युनिअर इंजिनीअरच्या परीक्षेत सनी लिओनी टॉपर
3 हिंदू धर्मग्रंथ वाचून शांतता मिळते, अमेरिकन ऑलिम्पिकपटूने दिली कौतुकाची पावती
Just Now!
X