News Flash

Video: पांड्या-धोनीमध्ये शर्यत, पाहा कोण जिंकलं

धोनीला हरवण्यासाठी हार्दिक पूर्ण शक्ती एकवटून धावला

३६ वर्षांचा धोनी आणि २४ वर्षांच्या हार्दिक पांड्यामध्ये शर्यत लागली.

भारतीय संघातील महेंद्रसिंह धोनीने चपळ क्षेत्ररक्षण आणि मैदानात चोरटी धाव घेण्याची क्षमता अनेकदा दाखवून दिली आहे. संघातील युवा खेळाडूंना देखील त्याचा हा अंदाज थक्क करुन सोडतो. नुकताच बीसीसीआयने अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि धोनी यांच्यातील शर्यतीचा एक व्हिडिओ शेअर केलाय. यात युवा खेळाडूसोबत धोनी १०० मीटर धावताना दिसत आहे.

वॉर्मअप सेशनदरम्यानचा हा व्हिडिओ आहे. यावेळी ३६ वर्षांचा धोनी आणि २४ वर्षांच्या हार्दिक पांड्यामध्ये शर्यत लागली. तरूण हार्दिकनं धोनीला हरवण्यासाठी चांगलीच कंबर कसली. धोनीला हरवण्यासाठी हार्दिक आपली पूर्ण शक्ती एकवटून धावला. पण धोनी काही कच्चा लिंबू नव्हता. अष्टपैलू धोनीनं हार्दिकच्या वेगाशी बरोबरी करत त्यानं बाजी मारली. तेव्हा धोनीचा हा फिटनेस पाहून हार्दिकही थक्क झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2017 1:32 pm

Web Title: watch video mahendra singh dhoni beats hardik pandya in a 100 metre race
टॅग : Hardik Pandya,Ms Dhoni
Next Stories
1 Video : जाणून घ्या पिंपरी- चिंचवडमधल्या गरम पाण्याच्या झऱ्यामागचं व्हायरल सत्य
2 ‘एअर डेक्कन’नं प्रवास करा फक्त १ रुपयात
3 ‘विरुष्का’चं लग्न विसरा; अंबानींच्या मुलाच्या लग्नपत्रिकेची किंमत ऐकाल तर थक्क व्हाल!
Just Now!
X