News Flash

VIDEO: कोमोडो ड्रॅगनने माकडाला जिवंत गिळले

अवघ्या काही क्षणांमध्ये माकडाला जिवंत गिळले

सरडा प्रकरातील जगातील सर्वात मोठ्या आकाराचे प्राणी म्हणजे कोमोडो ड्रॅगन. तीन मीटर लांब आणि ७० किलोपर्यंत वजन असणाऱ्या कोमोडो ड्रॅगनला नुसते पाहिले तरी अनेकांना धडकी भरते. आपल्या अवढव्य आकारामुळे आणि ताकदीमुळे या ड्रॅगनसमोर कोणत्याही भक्षाचा निभाव लागत नाही. हे ड्रॅगन पक्षी, लहान प्राणी अगदी एका दमात फस्त करतात. या ड्रॅगनचा चावा विषारी असतो असं मानलं जातं. त्यांनी एकदा आपली शिकार तोंडात पकडली ती त्या प्राण्याचा मृत्यू निश्चित असतो असं मानलं जातं.

कोमोडो ड्रॅगनच्या शिकार करण्याच्या शैलीची झलक दाखवणारा असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कोमोडो ड्रॅगन माकडाला जिवंत गिळताना दिसत आहे. माकडाचे अर्धेहून अधिक शरीर या ड्रॅगनच्या तोंडात असताना सुरु होणाऱ्या या व्हिडिओमध्ये ड्रॅगन अवघ्या काही क्षणांमध्ये माकडाला जिवंत गिळताना दिसतो.

कोमोडो ड्रॅगन हे प्रामुख्याने इंडिनेशियामधील कोमोडो, रिंका, फ्लोरिस आणि गिली मोटँग या बेटांवर अढळून येतात. सामान्यपणे जंगलांमध्ये हे ड्रॅगन हरणं, साप आणि डुक्कर खाऊन जगतात. जास्तीत जास्त २४ किमोमीटर प्रती तास वेगाने ड्रॅगन पळू शकतात. आपल्या वजनाच्या ८० टक्क्यांपर्यंत आकार असणाऱ्या प्राण्याची हे ड्रॅगन सहज शिकार करु शकतात. या ड्रॅगनची लाळ विषारी समजली जाते, ज्यामध्ये ५० हून अधिक प्रकारचे विषाणू असतात. पाहा हा व्हायरल झालेला व्हिडिओ

कोमोडो ड्रॅगन माणसांवर हल्ला करत नाहीत. मात्र आतापर्यंत वेगवगेळ्या घटनांमध्ये चार जणांचा या ड्रॅगन्सच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची नोंद आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2019 4:08 pm

Web Title: watch video of a komodo dragon swallowing a live monkey scsg 91
Next Stories
1 Viral video : दारूच्या नशेत तरूणाने चक्क घेतला पोलीस अधिकाऱ्याचा मुका
2 आगळावेगळा सन्मान; वाघाच्या बछड्याला दिलं हिमा दासचं नाव
3 Chandrayaan 2: गरीबीमुळे शेती करत घेतलं शिक्षण, इस्रो प्रमुखांची थक्क करणारी झेप
Just Now!
X