सोशल मीडियावर ‘ब्रिटन गॉट टॅलेन्ट’ या रिअॅलिटी शोमधला एका डान्सचा व्हिडिओ सध्या धुमाकूळ घालत आहे. निऑन रंगाचा वापर करून एका सैबेरियन ग्रुपनं ऑप्टिकल इल्यूशन तयार करत एक भन्नाट प्रयोग मंचावर सादर केला होता. या सैबेरियन ग्रुपनं मंचावर सादर केलेला हा प्रयोग इतका अफलातून होता की परीक्षकही अवाक् होऊन तो प्रयोग पाहत होते.

‘या’ देशातील महिलांच्या मते प्रेम म्हणजे वेळेचा अपव्यय

Video : भले भले हिरो ‘या’ लिटिल मास्टरच्या डान्स समोर पडतील फिके

सुरूवातीपासून शेवटपर्यंत परीक्षक आणि प्रेक्षकांना या ग्रुपनं अक्षरश: खिळवून ठेवलं होतं. त्यामुळे शेवटपर्यंत कोणाच्याही नजरा या ग्रुपनं सादर केलेल्या अप्रतिम कलाकृतीवरून हटल्याच नव्हत्या. सैबेरियन ग्रुपनं या सादरीकरणानं लाखो लोकांची मनं जिंकून घेतली होती. २०१५ मधला हा व्हिडिओ दोन वर्ष उलटल्यानंतरही सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. इतकं अफलातून आणि भन्नाट सादरीकरण करूनही या ग्रुपनं २०१५ सालची ‘ब्रिटन गॉट टॅलेन्ट’ ही स्पर्धा जिंकली नाही. त्याऐवजी दुसऱ्या ग्रुपनं बाजी मारली. पण, या सैबेरियन ग्रुपचा हा डान्स आजही लोक तितक्याच आवडीनं पाहत आहेत.