News Flash

Viral Video : श्रीलंकेच्या बॅट्समनचा हा शॉट पाहून तुम्हीही डोक्यावर हात माराल

याला म्हणतात स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारणं

शेवटी अवघडलेला चमारा मान खाली घालून पेवेलियनमध्ये परतला

क्रिकेटमध्ये प्रत्येक बॅट्समनचा खेळण्याची शैली वेगळी असते. बॉलरनं टाकलेला चेंडू जास्तीत जास्त लांब कसा टोलवता येईल यासाठी प्रत्येक बॅट्समन वेगवेगळ्या प्रकारे शॉट खेळतो. मैदानात शॉट्स खेळण्यापूर्वी तितकाच सराव आणि अनुभव बॅट्मनच्या गाठीशी लागतो. पण ही गोष्ट श्रीलंकन बॅट्समन चमारा सिल्वा यानं फारशी गांभीर्यानं घेतलेली दिसत नाही, म्हणूनच एका स्थानिक मॅचमधला त्याचा व्हिडिओ सध्या नेटिझन्सच्या थट्टेचा विषय ठरत आहे.

सर्वात मोठ्या ग्रंथालयाचं सत्य समजल्यावर वाचक झाले नाराज

कोलंबोमध्ये सुरू असलेल्या स्थानिक मॅचमध्ये खेळण्यासाठी मोठ्या ऐटीत चमारा मैदानात उतरला. बॉलरनं बॉल टाकल्यावर तो बॅटनं टोलवायच्याऐवजी चमारा सगळ्यात भन्नाट शॉट खेळायला गेला. पण या नादात त्याचा अंदाज इतका चुकला की शॉट मारण्यासाठी तो चक्क स्टंपच्या मागेच गेला. यामुळे झालं असं की बॉल थेट स्टंपवर येऊन आदळला आणि चमारा क्लिन बोल्ड झाला.

Viral : भावाला समुद्र दिसू नये म्हणून त्याने बांधली विचित्र इमारत

शेवटी अवघडलेला चमारा मान खाली घालून पॅव्हेलियनमध्ये परतला. चमाराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो पाहून तुम्हीही हसून लोटपोट व्हाल हे नक्की!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 12:07 pm

Web Title: watch video sri lankan batsmans chamara silva attempt at a bizarre shot
Next Stories
1 Viral Video : पाणीपुरीही खातानाचा कुत्र्याचा हा व्हिडिओ पाहिलात?
2 वाऱ्याच्या वेगानं व्हायरल होतोय ‘या’ महिला पोलीस अधिकाऱ्याचा फोटो
3 १८ हजार प्रेक्षकांसमोर तोल घसरून पडलेल्या मॉडेलनं पाहा पुढे काय केलं
Just Now!
X