करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास लाखभर लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे.

CoronaVirus : जोफ्रा आर्चरने सहा वर्ष आधीच केलेलं भाकित?

करोनाचा क्रीडा क्षेत्रालाही फटका बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. सुरू असलेल्या काही क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सदैव व्यस्त असणारे जगभरातील क्रीडापटू, क्रीडा संस्थांचे कर्मचारी आणि समालोचक यांनाही मोकळा वेळ मिळाला आहे. या वेळेचा प्रत्येक जण स्वत:च्या पसंतीनुसार उपयोग करत आहे. रग्बी या खेळाचे समालोचन करणारा लंडनमधील समालोचक नीक हिथ याने तर एक भन्नाट पर्याय शोधून काढला आहे. त्याने नुकतेच गवतावर खेळणाऱ्या आणि मजा-मस्ती करणाऱ्या कुत्र्यांचा धावण्याचे समालोचन केले आहे.

“मोदीजी, तुमचा व्हिडीओ दाखवा… घंटा वाजवलीत की टाळ्या?”

सध्या जगातील सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत, पण समालोचन हे रक्तातच असल्याने नीकने थेट हा पर्याय शोधून काढला आहे. त्याने या आधी एका शॉपिंग मॉलमध्ये कपेडी खरेदी करणाऱ्या माणसाचेही समालोचन मजेशीर पद्धतीने केले होते.

टोक्यो ऑलिम्पिक २०२० नव्हे, २०२१… अखेर ऑलिम्पिक आयोजन लांबणीवर!

क्रीडा क्षेत्रातील सर्व स्पर्धांना अल्पविराम मिळाला असताना नीकच्या या समालोचनाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.