News Flash

वय वर्ष ८३..! ‘वेटलिफ्टर दादी’चा व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

वेटलिफ्टर दादीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?

वेटलिफ्टर दादी किरण बाई (फोटो सौजन्य -चिराग चोरडिया इंस्टाग्राम)

इच्छाशक्ती प्रबळ असली, की सर्व गोष्टी साध्य करता येतात. याचाच प्रत्यय ‘वेटलिफ्टर दादी’ने दाखवला आहे. वयाच्या ८३व्या वर्षी या आजी वेटलिफ्टिंग करतात. किरण बाई असे नाव असलेल्या या आजींनी आपल्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. चेन्नईत राहणाऱ्या या आजींना लहाणपणापासून खो खो, कबड्डी अशा खेळांमध्ये रस होता. किरण बाईंच्या नातवाने सोशल मीडियावर आपल्या आजीचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत, जे आता बरेच व्हायरल होत आहेत.

किरण बाई या वयातही खूप तंदुरुस्त आहेत. गेल्या वर्षी अपघातानंतर वेटलिफ्टर होण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला. मागील वर्षी पडल्यामुळे त्याने त्याच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्यांना व्यवस्थित चालण्यास बराच वेळ लागला. आपण पुन्हा चालू शकणार की नाही, याची भीतीही त्यांना वाटू लागली होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Chirag Chordia (@chordia.chirag)

किरण बाईंचा नातू एक जिम ट्रेनर आहे. तोच आपल्या आजीला प्रशिक्षण देतो. किरण बाईंचे संपूर्ण घर जिममध्ये रुपांतर झाले आहे. नातवाने आजीसाठी वर्कआउट्सच्या योजनाही तयार ठेवल्या आहेत. एका आठवड्यातून किरण बाई तीनदा वजन उचलतात. त्यां त्यांच्या सत्राची सुरूवात कसरत करुन करतात. यावर्षी ८३व्या वाढदिवशी किरण बाईंच्या नातवाने तिचा एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये त्या २५ किलो वजन उचलताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 4:13 pm

Web Title: weightlifter dadi kiran bai video goes viral on social media adn 96
Next Stories
1 WTC Final Day 3 : तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडच्या २ बाद १०१ धावा
2 कोहलीमुळे भारत सुस्थितीत!
3 भारतीय ऑलिम्पिकपटूंसाठी कडक नियमावली