तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला विजयासाठी एका बळीची गरज आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी ५२१ धावांचे आव्हान दिले होते. मात्र दुसऱ्या डावात बटलर-स्टोक्ससचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आली नाही. बटलर-स्टोक्सने शतकी भागिदीरी करत संघाचा डाव सावरला. बुमराने बटलरला बाद करत ही जोडी फोडली. बटलर बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या वोक्सला बुमराने लगेच माघारी परतवले.

बुमराने टाकलेला बाऊन्सर ख्रिस वोक्सला समजलाच नाही. बुमराने सामन्याच्या चौथ्या दिवशी अचूक टप्यावर मारा करत इंग्लंडच्या फलंदाजांना बाद केले. सोशल मीडियावर बुमराच्या गोलंदाजीचे कौतुक होत आहे. आयसीसीने बुमराच्या गोलदांजीचा दाद देत कौतुकास्पद ट्विट केले आहे. बुमराने ख्रिस वोक्सला टाकलेला बाऊन्सर पाहून तुमच्या डोक्यात काय विचार येतात असा प्रश्न त्यांनी केला आहे. त्याखाली चौथ्या दिवसाचा बुमराने वोक्सला टाकलेला बाऊंसरच्या क्षणाचा फोटो टाकला आहे. त्यावर दिग्गज खेळाडू मायकल होल्डिंगचे स्टेटमेंट पोस्ट केले आहे. बुमराने टाकलेला बाऊंसर सर्वोत्कृष्ट होता. खूप दिवसांनंतर असा बाऊन्सर पाहिला. आतापर्यंत मी पाहिलेल्या बाऊन्सरमध्ये हा उत्कृष्ट आहे.

इंग्लंड दौऱ्यापूर्वी मायकल होल्डिंगने बुमराच्या भारतीय संघातील निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. बुमरा आताच इंग्लंडमध्ये कोसटी खेळण्यास सज्ज नसल्याचे मत होल्डिंग यांनी व्यक्त केले होते. बुमराने तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावत दोन आणि दुसऱ्या डावात पाच बळी घेत होल्डिंगला प्रतित्तुर दिले आहे.