ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटीत चेंडूशी छेडछाड केल्याचं समोर आलं आणि अवघं क्रिकेटविश्व ढवळून निघालं. केप टाउन कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी जे काही केलं त्याला क्रिकेटमध्ये चीटिंग म्हटलं जातं. बॉल टॅम्परिंग म्हणजे चेंडूशी छेडछाड. क्रिकेटमधला हा एक गंभीर गुन्हा मानला जातो. आपण आज जाणून घेऊया, की बॉल टॅम्परिंग म्हणजे नेमकं काय, का केली जाते बॉल टॅम्परिंग, काय फायदा होतो त्यामुळे.

बॉल टॅम्परिंग म्हणजे चेंडूशी छेडछाड. म्हणजे चेंडूचा आकार बदलण्याचा प्रयत्न करणं. गोलंदाजाची चेंडूवर योग्य पकड बसावी म्हणून चेंडूच्या शिलाईवर काही प्रयोग केले जातात. चेंडूची शिलाई ढीली केली जाते. धातूच्या वस्तूने किंवा टेपच्या माध्यमातून चेंडूचा पृष्ठभाग किंवा आकार बदलल्याचे काही प्रकार क्रिकेटच्या मैदानावर यापूर्वी घडले आहेत. मैदानावरील मातीत चेंडू घासून अथवा नखांनी किंवा टणक वस्तूने छेडछाड करायचा बऱ्याचदा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर चेंडूचा पृष्ठभाग बदलण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक वर्षांपूर्वी चेंडूला ग्रीस लावून त्याचा पृष्ठभाग बदलला जायचा. त्यानंतर काही वर्षांनी ग्रीसचा वापर बंद झाला, आणि च्युईंगम किंवा जेली बिन्स याप्रकारासाठी वापरल्या जाऊ लागल्या.

team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया
kl rahul still not fit likely to miss 5th Test against england in dharamsala
केएल राहुल अजूनही जायबंदीच;अखेरच्या कसोटी सामन्यातही खेळण्याची शक्यता कमीच
Neil Wagner retires
नील वॅगनर; सळसळत्या चैतन्याची अनुभूती देणारा योद्धा
Sarfaraz Khan's Cricket Journey
Sarfaraz Khan : ‘…तर रेल्वेमध्ये कपडे विकायला जाऊ शकतो’, सर्फराझच्या वडिलांना आठवला ‘तो’ भावनिक प्रसंग

काय फायदा होतो –
बॉल टॅम्परिंगमध्ये संपूर्ण सामन्याचं पारडं दुसरीकडे झुकवण्याची क्षमता असते असं बोलतात. चेंडूला रिव्हर्स स्विंग मिळावा यासाठी मुख्यत्वे क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू बॉल टॅम्परिंगचा मार्ग अवलंबतात. चेंडूची एक बाजू चमकावण्याचा किंवा खराब करण्याचा त्यांचा प्रय़त्न असतो. अशाप्रकारच्या चेंडूला जास्त स्विंग मिळतो किंवा चेंडू अधिक वेगाने जातो. त्यामुळे खेळपट्टीवर स्थिरावलेला फलंदाजही अनेकदा चकतो, तर खेळपट्टीवर नवख्या असलेल्या फलंदाजांची अक्षरशः भंबेरी उडते. त्यामुळेच क्रिकेटमध्ये बॉल टॅम्परिंगला गंभीर गुन्हा मानलं जातं.