सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत आहे. कधी व्हिडिओ, कधी छायाचित्र तर कधी बातम्या पण याचा अतिरेक झाला की मात्र नेटीझन्सची व्हायरलची साथ हटवण्याची मोहिम सुरू होते. आता या जांभळ्या पक्ष्याचंच घ्या ना. याच महिन्याच्या सुरुवातीला ट्रॅश डव्हची सोशल मिडियावर हवा होती अन् या पक्ष्याला जणू ट्रॅशच करण्याची मोहिम सोशल मीडियावर सुरू आहे. या जांभळ्या पक्षाची साथ आपल्याकडे जरी फारशी परसली नसली तरी ती इथे येण्याआधीच हा पक्षी नक्कीच बाहेर झालेला असंच चित्र दिसतंय.

वाचा : ‘फेसबुक’वरून आता नोकरीही शोधता येणार!

फिनलँडमधली आर्टिस्ट Syd Weiler हिने पर्पल डव्हचे स्टिकर्स बनवले होते. या जांभळ्या पक्ष्याचे स्टिकर्स साधरण फेब्रुवारी महिन्यात व्हायरल होऊ लागले. एका थाई फेसबुक पेजवर पहिल्यांदाच या पक्षाचे स्टिकर दाखवण्यात आले. त्यानंतर हा पर्पल डव्ह इतका व्हायरल झाला की प्रत्येकाच्या वॉलवर हाच पक्षी दिसू लागला. याचा इतक्या मोठ्या प्रमाणात अतिरेक झाला की या पर्पल डव्हचे नामकरणच नेटीझन्सने ‘ट्रॅश डव्ह’ करून टाकले. आणि याला सोशल मीडियावरुच ट्रॅश करण्याची मोहिम सुरू झाली.

वाचा : घरभाडे देण्यासाठी पैसे नसल्याने बसमध्येच थाटला संसार

त्यातून कपाळमोक्ष करून घेण्याचा प्रयत्न करणा-या या पर्पल डव्हचे स्टिकर्स आणि मीम सर्वाधिक व्हायरल होत आहेत. एखाद्याची पोस्ट आवडली नाही तर त्याच्या पोस्टवर हेच जांभळे स्टिकर्स चिटकवण्याची जणू क्रेझच सुरू झाली. त्यामुळे या अतिरेकाने कंटाळलेल्या नेटीझन्सने हा ट्रॅश डव्ह बॅन करण्यासाठी ऑनलाइन पिटीशन दाखल केली असून हजारो लोकांनी त्यावर सहीही केली आहे. इतकेच नाही तर मार्क्स झकरबर्गलाही काहींनी मेसेज करून हा स्टिकर बॅन करण्याची मागणी केली आहे.