News Flash

दातांच्या आकारावरून ओळखा स्वभाव

दातांच्या आकाराकडे पाहून स्वभावाविषयी अचूक अंदाज बांधला जातो

दातांचे एकूण चार प्रकार आहेत, चौकोनी, अंडाकृती, आयताकृती आणि त्रिकोणी. दातांचे हे आकार पाहून माणसाच्या व्यक्तीमत्त्वाविषयी अंदाज बांधण्यात येतात.

माणसाचा स्वभाव ओळखणे म्हटले तर सोपे म्हटले तर कठीण काम. आपल्याशी चांगल्या वागणा-या प्रत्येक माणसाचा स्वभाव चांगला असतोच असे नाही, त्यामुळे त्याच्या वागण्या बोलण्यावरून आपण काही त्या माणसाच्या स्वभावाविषयी अचूक अंदाज बांधू शकत नाही. नेहमी म्हणतात जसे दिसते तसे नसते त्यामुळे माणसाच्या दिसण्यावर कधीच जाऊ नये. पण, तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक प्रकार असाही आहे ज्यात माणसाच्या चेह-यावरून त्याचा स्वभाव सांगितला जातो. ‘मॉर्फोसाईकॉलॉजी’ म्हणून हा प्रकार ओळखला जातो. यात चेह-याच्या ठेवणीवरून तुमच्या स्वभाव आणि व्यक्तीमत्त्वाविषयी तर्क बांधले जातात. अनेकदा हे तर्क अचूकही असतात. या पद्धतीत माणसांच्या दातांच्या आकाराकडे पाहून त्याच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल विश्लेषण केले जाते.

वाचा : जाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे

दातांच्या प्रकारावरुन कसे केले जाते व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण ?
दातांचे एकूण चार प्रकार आहेत, चौकोनी, अंडाकृती, आयताकृती आणि त्रिकोणी. दातांचे हे आकार पाहून माणसाच्या व्यक्तीमत्त्वाविषयी अंदाज बांधण्यात येतात.

चौकोनी दात :  या आकारांचे दात असलेल्या व्यक्ती फारच शांत असतात. आपल्या भावनांवर आणि रागावर संयम ठेवणे त्यांना उत्तम जमते. न्याय्य बाजू कोणती हे त्यांना ओळखता येते, त्यामुळे अशी माणसे चांगले मित्र किंवा मैत्रिण होऊ शकतात. दुस-या व्यक्तीची बाजू शांतपणे ऐकून घेण्याची कला त्यांना अवगत असते.

अंडाकृती दात : अंडाकृती आकारांचे दात असलेली माणसे खूपच सर्जनशील समजली जातात. प्रत्येक गोष्टींकडे बघण्याचा त्यांच्या दृष्टीकोन कलात्मक असतो. आपल्या दिसण्यापासून ते कपडे आणि चालण्या बोलण्याकडे ही माणसे विशेष लक्ष देतात. कलेविषयी यांना अधिक माया असते. दुसरी गोष्ट म्हणजे ही माणसे जितकी कलात्मक असतात तितकीच संवेदनशीलही असतात. त्यामुळे छोट्या मोठ्या कारणांनी दुखावली गेल्यामुळे ही माणसे उदास असतात.

त्रिकोणाकृती दात : या माणसांचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन खूपच सकारात्मक असतो. आयुष्य मजेत कसे जगावे हे यांना नेमके ठाऊक असते. कधीकधी त्यांच्या स्वभाव पाहता त्यांना बेजबाबदार असा ठपका बसतो पण, कोणत्या क्षणी कोणता निर्णय घ्यायचा त्यांना ठाऊक असते. भविष्याचा विचार करण्यापेक्षा आजचा दिवस कसा मजेत घालवता येईल हे देखील त्यांना माहिती असते.

आयताकृती दात : ही माणसे भरपूर बोलकी असतात. आपले काम कसे करून घ्यायचे हे त्यांना माहित असते. कोणती गोष्ट कधी आणि किती वेळात करायची यांची गणितं त्यांनी आधिच डोक्यात मांडलेली असतात त्यामुळे त्यांच्या योजना सफल होतातच. प्रत्येक गोष्टीचा ते तटस्थपणे विचार करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 4:12 pm

Web Title: what the shape of your teeth
Next Stories
1 जाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे
2 नोटाबंदी: बेवफा प्रियकर सापडला बँकेच्या रांगेत
3 नोटाबंदीनंतर वधुच्या मेकअपसाठी पार्लरने दिली EMI ची सुविधा
Just Now!
X