News Flash

‘मित्राने भेटायचा आग्रह केला तर त्याला इतकचं सांगा की…’; मुंबई पोलिसांनी पोस्ट केला व्हिडिओ

व्हिडिओला दोन तासांमध्ये २० हजार व्ह्यूज

‘मित्राने भेटायचा आग्रह केला तर त्याला इतकचं सांगा की…’; मुंबई पोलिसांनी पोस्ट केला व्हिडिओ
मुंबई पोलीस (प्रातिनिधिक फोटो) (फोटो: पीटीआय)

जुन्या चित्रपटांमधील गाणी रिमिक्स करुन वापरण्याचा ट्रेण्ड बॉलिवूडमध्ये तसा काही नवा नाही. अगदी तरुणाईच्या भाषेत सांगायचं तर अनेक जुन्या गाण्यांची रिमिक्सने वाट लावली आहे. मात्र मुंबई पोलिसांनाही थेट १९७५ साली प्रदर्शित झालेल्या खेल खेल मे या चित्रपटातील गाणं पोस्ट करत एक भन्नाट मेसेज तरुणाईला दिला आहे. या चित्रपटातील एक मैं और एक तू या गाण्यातील काही सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन पोस्ट केलला हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

मुंबई पोलिसांनी हा व्हिडिओ पोस्ट करताना भन्नाट कॅप्शन दिली आहे. तुमच्या ग्रुपमधील एखादा पार्टी अ‍ॅनिमल म्हणजेच पार्टी करण्यासाठी सदा उत्सुक असणारा एखादा मित्र तुम्हाला या करोनाच्या काळात भेटण्यासंदर्भात सांगत असेल तर तुम्ही काय म्हणाल अशी कॅप्शन या व्हिडिओ दिली आहे. या कॅफ्शनसहीत “दुरिया वक्त आने पर मिटाऐंगे” अशी ओळ असणारी क्लिप पोलिसांनी पोस्ट केली आहे.

 

View this post on Instagram

 

My ‘Party-Animal’ Friends: Long time no see – let’s ‘get-together’ ‘Social Distancing’ Me:

A post shared by Mumbai Police (@mumbaipolice) on

हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर दोन तासांमध्ये २० हजारहून अधिक व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत. अनेकांनी पोलिसांच्या या क्रिएटीव्हीटीला सलाम केला असून अगदी हलक्या पुलक्या पद्धतीने महत्वाचा मेसेज देणाऱ्या पोलिसांचे कौतुक केलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2020 1:02 pm

Web Title: what to say to your party animal friends who ask you to get together mumbai police answers scsg 91
Next Stories
1 अनुष्काची सोबत असतानाही विराट मिस करतोय ‘ही’ गोष्ट
2 वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी फायद्याची बातमी
3 चहावाल्याच्या मुलीची झेप : एअरफोर्स अ‍ॅकेडमीत अव्वल, होणार ‘फ्लाईंग ऑफिसर’
Just Now!
X