बॉल टॅम्परिंग प्रकरणात ऑस्ट्रेलियन संघाची चांगलीच नाचक्की झाली आहे. दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग केल्याचं कप्तान स्टिव्हनं जगासमोर मान्य केलं. या प्रसंगानंतर सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटला डाग लागला. हे प्रकरण समोर आल्यानंतर फक्त ऑस्ट्रेलियनच क्रिकेटप्रेमीच नाही तर जगभरातील क्रिकेट प्रेमी टिम ऑस्ट्रेलियाला सोशल मीडियावर ट्रोल करत आहे. या संघाला ट्रोल करण्याची एकही संधी नेटकऱ्यांनी सोडली नाही.

बॉल टॅम्परिंग म्हणजे नेमकं काय? का करतात बॉल टॅम्परिंग?

या ट्रोलिंगमध्ये आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे. ‘फॉलो युअर स्पोर्ट’ FOLLOW YOUR SPORT या फेसबुक पेजनं एक व्हिडिओ पोस्ट केलाय. ज्यात ऑस्ट्रेलियन संघाचे ‘शोले’ स्टाईलनं अक्षरश: वाभाडे काढले आहेत. टीम ऑस्ट्रेलियाच्या बॉल टॅम्परिंग प्रकरणी रिकी पाँटींगनं जर स्टिव्ह, डेव्हिड वॉर्नर बँकरॉफ्ट यांना फैलावर घेतलं असतं तर तो प्रसंग कसा असता? याचं चित्र उभं करण्यात आलं आहे. त्यातून रिकी या तिघांना फैलावर घेत असताना विराट कोहलीसह क्विंटन डी-कॉक, फाफ डु प्लेसीस, जो रूट, बेन स्टोक्स, रबाडाला जो आनंद होईल तेव्हा ते काय प्रतिक्रीया देतील याचं जे मजेशीर चित्र उभं करण्यात आलंय ते पाहताना खूपच धम्माल येत आहे. विशेष म्हणजे गब्बरचा सर्वात गाजलेला डायलॉग ‘कितने आदमी थे?’ रिकीच्या तोंडून ऐकताना तर आणखी मज्जा येत आहे.

‘घरवापसी’ करणाऱ्या स्टिव्ह स्मिथसाठी एअर न्यूझीलंडची विशेष ऑफर

सोशल मीडियावर सर्वात हिट ठरलेला हा व्हिडिओ १५ तासांच्या आत १० हजार जणांनी शेअर केला आहे. या प्रकरणात एअर न्यूझीलंड या विमानसेवनं देखील स्टिव्ह आणि ऑस्ट्रेलियन संघाची खिल्ली उडवण्याची संधी सोडली नव्हती. एअर न्यूझीलंडचा हा व्हिडिओ देखील तितकाच इपाट्यानं व्हायरल झाला होता.