आजच्या तरूण पिढीची मुलभूत गरज बनलेले व्हॉट्स अॅपने  वापरकर्त्यांसाठी  व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु केली आहे. सोशल माध्यमातील लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपने  मंगळवारी व्हिडिओ कॉलिंग सुविधा सुरु केल्याचे जाहीर केले.  यापूर्वी  कपंनी बीटा व्हर्जनमध्ये व्हिडिओ सुविधा सुरु केली होती. त्यामुळे चाचणी स्वरुपातील व्हिडिओ कॉलिंगचा  सर्व स्मार्टफोन धारकांना लाभ मिळाला नव्हता. पण आता एका अपडेटनंतर व्हॉटसअपवरुन व्हिडिओ कॉल करणे शक्य होणार आहे. कंपनीने  अँड्रोइड , आयवोएस आणि विडोंज स्मार्टफोनसाठी एकत्रितपणे नवीन अपडेट उपलब्ध केले आहे. लवकरच कंपनीचे हे नवीन अपडेट उपलब्ध होणार आहे.

अँड्रोइड  वापरकर्त्यांसाठी नवीन अपडेट गुगल प्ले वर उपलब्ध होईल, तर आयवोएस स्मार्टफोनसाठी स्टोअरमधून व्हिडिओ कॉलिंगचे अपडेट मिळणार आहेत. विंडोज स्मार्टफोन धारकाला  हे नवीन अपडेट डाउनलोड करुन घेण्यासाठी विंडोज स्टोअरला भेट द्यावी लागेल.  या नव्या सुविधेमध्ये फ्रंट किंवा मागील बाजूला असणाऱ्या कॅमेराचा वापर करुन व्हिडिओ कॉल करणे शक्य आहे. तसेच कॉल स्वीकारण्यासाठी देखील तुम्ही दोन्ही कॅमेरांचा वापर करु शकता. व्हिडिओ कॉलिंगच्यावेळी एका कोपऱ्यामध्ये छोट्या आकारात इतर व्हिडिओ कॉलिंगप्रमाणे चित्र दिसण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. कॉलिंगवेळी दिसणारे चित्र कोणत्या कोपऱ्यात दिसावे याचे वापरकर्त्यांना  स्वतंत्र देण्यासाठी कंपनीने ते स्क्रोल करण्याची देखील सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

नेटवर्कच्या उपलब्धेनुसार व्हिडिओ कॉलची सुविधा अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकेल, असा दावा व्हॉटसअप कंपनीने केला आहे. व्हिडिओ कॉलिंग सुरु असताना तुम्ही स्मार्टफोनवर अन्य काम देखील करण्याची सुविधा देण्यात आली आहे.