जगभरामध्ये करोनाचा फैलाव झाला असून आशिया खंडामधील अनेक देशांचा याचा फटका बसला आहे. भारताचा शेजरी असणाऱ्या पाकिस्तानलाही करोनाचा मोठा फटका बसला असून तेथेही करोनामुळे भीतीचे वातावरण आहे. मात्र याच दरम्यान तेथील एका धर्मगुरुने दिलेला सल्ला सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे. या धर्मगुरुने आपल्या अनुयायांना करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून जास्तीत जास्त झोपण्याचा सल्ला दिला आहे. हा व्हिडिओ नक्की कुठे आणि कोणी शूट केला यासंदर्भात माहिती मिळालेली नसली तरी व्हिडिओमधील सल्ला अगदी स्पष्टपणे ऐकू येत असल्याने अनेकांनी यावरुन आता या धर्मगुरुंच्या सल्ल्याची चिकित्सा करण्यास सुरुवात केली आहे.

“आपले डॉक्टर कायमच जास्त काळ झोपण्याचा सल्ला देतात. आपण जेवढा जास्त वेळ झोपू तितक्या वेळ (करोना) विषाणूही झोपलेला असतो. अशावेळी तो आपल्याला त्रास देत नाही. आपण झोपतो तेव्हा तो ही झोपतो. आपण मरतो तेव्हा तो ही मरतो,” असं या व्हिडिओमध्ये हा धर्मगुरु सांगताना दिसत आहे.

या व्हिडिओला ३२ हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

१)
धन्यवाद हे त्या देशात आहेत

२)
कुठं शिकलात?

३)
थोर आहेत हे

४)
म्हणजे आपण आत्महत्या करायची का?

५)
तो आपल्याला कॉपी करतोय?

६)
आधी सांगायला पाहिजे होतं

७)
तो विषाणू सगळं करणार का?

८)
हे घ्या

९)
मास्क कसं घालावं शिका

१०)
सल्ला ऐकल्यावर

रविवारपर्यंत पाकिस्तानमधील करोनाबाधितांची संख्या एक लाख ४४ हजारच्या पुढे गेली आहे. देशात करोनामुळे दोन हजार ७०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. येथील आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशभरातील ८२० रुग्णालयांमध्ये जवळजवळ १० हजारच्या आसपास करोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. हजारो लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. राजधानी इस्लामाबादमधील अनेक भागांसहीत देशभरातील १३०० हून अधिक ठिकाणं पूर्णपणे बंद केली आहे.