28 October 2020

News Flash

Jio vs Airtel vs Vodafone: कोणाचे टॅरिफ प्लॅन्स आहेत बेस्ट ?

तिन्ही दिग्गज कंपन्यांच्या प्लॅनची तुलना, जाणून घ्या कोणाचा प्लॅन सर्वोत्तम

दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपन्या Reliance Jio, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने दरवाढ केली आहे. Airtel आणि व्होडाफोन-आयडियाचे नवे प्लॅन 3 डिसेंबरपासून लागू झालेत, तर जिओचे प्लॅन 6 डिसेंबरपासून लागू होतायेत. आता तिन्ही कंपन्यांनी Off-Net अर्थात इतर नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग संपवली आहे, on-net (एकाच नेटवर्कवर) कॉलिंग अद्यापही मोफत आहे. या तिन्ही कंपन्यांनी दरवाढीनंतरचे आपले नवे प्लॅन सादर केलेत. त्यामुळे या तिन्ही कंपन्यांच्या प्लॅनची तुलना करुन जाणून घेऊया कोणाचा प्लॅन सर्वोत्तम आहे.

जिओ 129 रु. vs एअरटेल 148 रु. vs व्होडाफोन-आयडिया 149 रु. प्लॅन –
या तिन्ही कंपन्यांच्या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. जिओच्या 129 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 2 जीबी डेटा आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिटे मिळतात. जिओ ते जिओ नेटवर्कवर कॉलिंग मोफत आहे. एअरटेलच्या 148 रुपयांच्या प्लॅनमध्येही 2 जीबी डेटा आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिटे मिळतात. एअरटेलप्रमाणेच सेवा व्होडाफोनच्या 149 रुपयांच्या प्लॅनमध्येही आहे.

जिओ 199 vs एयरटेल 248 vs व्होडाफोन-आयडिया 249 –
या तिन्ही प्लॅन्सची वैधता 28 दिवसांची आहे. तिन्ही कंपन्यांच्या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सेवा देखील सारख्याच आहेत. ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा वापरण्यास मिळेल. एकाच नेटवर्कवर कॉलिंग अमर्यादित असून अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिटे मिळतील.

जिओ 249 vs एअरटेल 298 vs व्होडाफोन-आयडिया 299 प्लॅन –
या प्लॅन्सची वैधताही 28 दिवस आहे. फरक केवळ एवढाच आहे की, यामध्ये 1.5 जीबीऐवजी दररोज 2 जीबी डेटा मिळेल. अशाप्रकारे ग्राहकांना एकूण 56 जीबी डेटा मिळतो. एकाच नेटवर्कवर कॉलिंग अनलिमिटेड असून, अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिटं मिळतील.

जिओ ₹349 vs एअरटेल ₹398 vs व्होडाफोन-आयडिया ₹399 –
जिओच्या 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 1000 मिनिटं जिओवरुन अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी मिळतात. यामध्ये ग्राहकांना 3 जीबी डेटा प्रतिदिन मिळेल. तर, एअरटेल आणि व्होडाफोनच्या प्लॅनमध्येही अगदी सारख्याच सेवा मिळतात.

जिओ ₹555 vs एअरटेल ₹598 vs व्होडाफोन-आयडिया ₹599 –
या तीन प्लॅन्सची वैधता 84 दिवस आहे. जिओच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा आणि 3,000 मिनिटं अन्य नेटवर्क्सवर कॉलिंगसाठी मिळतात. एअरटेलच्या 598 रुपये आणि व्होडाफोन-आयडियाच्या 599 रुपयांच्या प्लॅनमध्येही याच सुविधा आहेत.

जिओ ₹599 vs एअरटेल ₹698 vs व्होडाफोन-आयडिया ₹699 –
या तीन प्लॅन्सची वैधताही 84 दिवस आहे. यामध्ये अमर्यादित कॉलिंगसह दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो. जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल या तिन्ही कंपन्या 3000 मिनिटं अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी देत आहेत.

जिओ ₹1299 vs एअरटेल ₹1498 vs व्होडाफोन-आयडिया ₹1499 प्लॅन –
जिओच्या 1299 रुपयांच्या प्लॅनमध्ये 365 दिवसांसाठी 24 जीबी डेटा आणि 12 हजार मिनिटं अन्य नेटवर्कवर कॉलसाठी मिळतात. एअरटेलच्या 1498 रुपये आणि व्होडाफोन-आयडियाच्या 1499 रुपयांच्या प्लॅनमध्येही याच सुविधा आहेत.

जिओ ₹2199 vs एअरटेल ₹2398 vs व्होडाफोन-आयडिया ₹2399 प्लॅन –
एक वर्षाची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा युजर्सना मिळेल. तर, जिओशिवाय अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 12,000 मिनिट मिळतील. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाचा याच प्लॅनसाठी अनुक्रमे 2,398 रुपये आणि 2399 रुपये मोजावे लागतील, सुविधाही जिओच्या प्लॅनप्रमाणेच आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2019 5:05 pm

Web Title: which is the best tarrif plans between jio vs airtel vs vodafone sas 89
Next Stories
1 आता आला Nokia चा ‘4K स्मार्ट टीव्ही’ , लाँचिंगलाच दिली डिस्काउंट ऑफर
2 इंग्रजांनी बंदिवान बनवलेलं झाडं १२१ वर्षांपासून साखळदंडात!
3 संवेदनशील खाकी : माढ्यातील पोलिसानं शेतकरी कर्जमाफीसाठी दिला पगार
Just Now!
X