News Flash

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह कोणता फोन वापरतात?

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि अन्य काही महत्त्वाचे मंत्री कोणत्या फोनचा वापर करतात

(संग्रहित छायाचित्र)

मोबाइलचा वापर न करणारा व्यक्ती आजच्या जगात सापडणं खरंच दुर्मिळ, या तंत्रज्ञानाच्या युगात जगातील सर्वात शक्तिशाली नेता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे दोन स्मार्टफोन वापरतात आणि ट्विटरला टाईपरायटर सारखं वापरतात हे तर आपण ऐकून आहोत. पण, आपले नेतेही टेक्नॉलॉजीच्या बाबतीत काही मागे नाहीत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि अन्य काही महत्त्वाचे मंत्री सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय राहण्यासाठी कोणत्या फोनचा वापर करतात.

वृत्तसंस्था IANS च्या वृत्तानुसार, नरेंद्र मोदी सरकारमधील अनेक प्रमुख मंत्री टेक्नोसेव्ही आहेत आणि ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात सक्रीय राहतात. यामध्ये त्यांचं नेतृत्व करतात ते स्वतः पंतप्रधान मोदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गॅजेट प्रेमी असून ते अॅपलचे लेटेस्ट फोन आणि इतर उपकरणांचा वापर करतात. 2018मध्ये चीन आणि दुबई दौऱ्यावेळी मोदी आयफोन-6 मालिकेतील फोन वापरताना दिसले होते. गॅजेटबद्दलचं प्रेम आणि सुरक्षा कारणास्तव पंतप्रधान मोदी अॅपलच्या सर्वश्रेष्ठ उपकरणाला प्राधान्य देतात. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत अॅपलची उपकरणं जगात सर्वोत्तम मानली जातात.

पंतप्रधान मोदींच्या खालोखाल गृहमंत्री अमित शाह हे अॅपलचा सर्वात नवीन Iphone XS वापरतात. जेव्हा कार्यकर्त्यांशी संपर्कात राहण्याची आवश्यकता असते त्यावेळेस अमित शाह फेसबुक आणि ट्विटरचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. ट्विटरवर सध्या त्यांचे एक कोटी 40 लाख फोलोअर्स आहेत. तर, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेद्र प्रधान अँड्रॉईड आणि Iphone अशा दोन्ही प्रकारच्या फोनचा वापर करतात.

फेसबुक-ट्विटरचा वापर –

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे फेसबुक आणि ट्विटर दोन्हीवर सक्रीय असतात. कार्यालयातील दैनंदीन कामावर लक्ष ठेवण्यासाठी, तसेच आपल्या र्यकर्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठीही गडकरींची पसंती ट्विटर आणि फेसबुकला असते. गडकरींचे सध्या ट्विटरवर 51.5 लाख फॉलोअर्स आहेत. याशिवाय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपल्या मंत्रालय आणि मोदी सरकारच्या कार्याबाबत माहिती देण्यासाठी , सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी केवळ ट्विटरचा वापर करतात. ट्विटरवर त्यांचे 22.3 लाख फॉलोअर्स आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 9:03 am

Web Title: which mobile does pm modi use sas 89
Next Stories
1 विमानात झोप लागल्याने अडकून पडलेल्या बाईची गोष्ट!
2 तैमुर आणि गोडसेबाबत ट्विट करुन MTNL ची झाली फजिती !
3 इम्रान खान समजून सचिनचा ‘तो’ फोटो केला पोस्ट, पाक पंतप्रधानांच्या विशेष सहाय्यकाची खिल्ली
Just Now!
X