निसर्गात खूप काही अद्भूत, चमत्कारीक आणि तितक्याच सुंदर गोष्टी आहेत. कधी-कधी आपल्याला त्या नजरेस पडत नाहीत एवढंच. पण जेव्हा केव्हा अशा गोष्टी नजरेस पडतात तेव्हा त्याचा मनमुराद आनंद घेता आला पाहिजे, नाही का? अशाच एका दुर्मिळ क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो एरवी क्वचितच पाहण्याचा योग कोणाच्या नशिबी आला असता. एका पांढऱ्या जिफाराचा हा व्हिडिओ आहे.

वाचा : एकेकाळी रस्त्यावर झोपणारा ‘तो’ तरुण आज कोट्यवधीचा मालक!

खरं तर पांढऱ्या रंगाचा जिराफ फार क्वचितच पाहायला मिळतो. पण केनियामधल्या नॅशनल पार्कमध्ये एक नाही तर दोन-दोन पांढरे जिराफ पाहायला मिळतात. मादी जिराफ आणि तिचे काही महिन्याचे पिल्लू अशी जोडी जंगलात मुक्तपणे फिरते. जून २०१७ मध्ये हे दृश्य टिपण्यात आलं होतं. आतापर्यंत या व्हायरल व्हिडिओला युट्युबवर साडेतीन लाखांहून अधिक व्हयूज मिळाले आहेत. जानेवारी २०१७ मध्ये टांझानियाच्या नॅशनल पार्कमध्ये अशाप्रकारे पांढरे जिराफ पाहायला मिळाले होते. शरीरात रंगद्रव्य तयार होण्याच्या क्षमतेत घट झाल्याने ते पांढऱ्या रंगाचे दिसतात.

वाचा : या फोटोला ‘अप्रतिम’ म्हणताय?, त्याआधी सत्य तरी जाणून घ्या!