01 March 2021

News Flash

MI vs KXIP सुपरओव्हरच्या थरारनाट्यातही लक्ष वेधून घेणारी ‘मिस्ट्री गर्ल’ आहे तरी कोण??

पंजाबने सामना जिंकला, सोशल मीडियावर मिस्ट्री गर्लचीच चर्चा

मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब या सामन्याने आयपीएलमध्ये इतिहासाची नोंद केली. निर्धारित वेळेतला सामना बरोबरीत सुटल्यामुळे सुपरओव्हर खेळवण्यात आली. परंतू दोन्ही संघातील गोलंदाजांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे पहिली सुपरओव्हरही अनिर्णित राहिली. यानंतर दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये पंजाबने मुंबईवर मात करत महत्वपूर्ण दोन गुण मिळवले. दोन्ही संघांमध्ये सुपरओव्हरचं थरारनाट्य सुरु असताना कॅमेरामॅनने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाला सपोर्ट करणाऱ्या एका तरुणीवर कॅमेरा फिरवला.

नेटकऱ्यांनीही संधी साधून या तरुणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत तिच्यावरुन मिम्स बनवायला सुरुवात केली. अनेकांना ही मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण असा प्रश्न पडला होता. रिआना ललवानी असं या तरुणीचं नाव असून याआधीही पंजाबच्या सामन्यांना तिने मैदानावर हजेरी लावली आहे. पाहूयात रिअनाला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कसं फेमस केलंय ते…

महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्यावर बनणारी मिम्स रिआनापर्यंत पोहचली असून तिनेही आपल्या सोशल मीडिया स्टोरीवर ते शेअर केली आहेत.

रिआनाच्या फेसबूक अकाऊंटवरुन मिळालेल्या माहितीनुसार तिचं शालेय आणि कॉलेजचं शिक्षक हे दुबईत झालं. सध्या ती इंग्लंडमधील विद्यापीठातून आपलं पदवीचं शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वीच रिआनाने आपला २३ वा वाढदिवस साजरा केला आणि या वेळच्या बर्थ-डे पार्टीचे फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर टाकले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 4:30 pm

Web Title: who is riana lalwani the mystery girl who became an internet sensation after kxip vs mi super over tie psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 ब्लाइंड डेटसाठी ती २३ जणांना घेऊन आली; दोन लाखांचं बिल पाहून प्रियकर फरार
2 Viral Video: पर्यटकांच्या जीपमध्ये चित्ता घुसला अन्…
3 Viral Video: जिलेबी आणि इमरती बनवणारी मशीन पाहून थक्क व्हाल
Just Now!
X