आशिया कप स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील दुसरा सामनाही भारताने अगदी सहज जिंकला असचं म्हणता येईल. ९ गडी राखून जिंकलेला हा सामना दुसऱ्यांदा फलंदाजी करताना भराताचा पाकिस्तानविरुद्धचा सर्वात मोठा विजय ठरला. याआधीचा सामनाही भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळताना सर्वाधिक चेंडू शिल्लक ठेऊन जिंकलेला सामना ठरला. एकंदरितच सांगायचे तर दोन्ही सामने अपेक्षेइतके रंजक आणि अटीतटीचे झाले नाही. म्हणूनच सध्या भारतीय चाहत्यांमध्ये पाकिस्तानी संघाऐवजी एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा सुरु आहे. आणि ती म्हणजे सामन्यादरम्यान कॅमेरामन्सने टिपलेली एक पाकिस्तानी चाहती.

सोशल मिडीयावर तुम्ही #IndvPak किंवा #IndiavsPakistan असे सर्च देऊन पाहिल्यास तुम्हाला पाकिस्तानी संघाच्या जर्सीमधील एका तरुणीचे फोटो दिसतील. या तरुणीच्या सौंदर्यावर भारतीय क्रिकेट चाहते अगदी फिदा झाल्याचे सध्या ट्विटरवर दिसत आहे. अनेकांनी तर प्रिया वारियरनंतर हिच पोरगी भारताचा नॅशनल क्रश असल्याचे सोशल मिडियावर सांगितले आहे. या मुलीच्या दिसण्यावर आणि लूक्सवर भारतीय चाहते इतके फिदा झाले आहेत की क्रिकेटच्या भल्यासाठी नही तर हिला पाहण्यासाठी तरी भविष्यात भारत आणि पाकिस्तान सामन्यांचे आयोजन करा अशी गळही बीसीसीआयला घातली आहे. विशेष म्हणजे ही तरुणी भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यातही पाकिस्तानी समर्थकांबरोबर काळे टी शर्ट घालून दिसली आणि नेटकऱ्यांमध्ये पुन्हा तिची चर्चा सुरु झाली. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार तिचे नाव निव्या नव्होरा असे असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. नेटकऱ्यांनी तिचे इन्स्टाग्राम अकाऊण्ट शोधून काढले असून त्याचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल होत आहेत.

‘क्रिकेटवाली गर्ल’

ही तरुणी भारतीय सिनेमांची आणि बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची मोठी फॅन असल्याचे समजते. तिला क्रिकेटची विशेष आवड असल्याचे तिच्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवरून दिसून येते. कारण तिने आपल्या बायोमध्ये स्वत:ची ओळख ‘क्रिकेटवाली गर्ल’ अशी करुन दिली आहे.

पाहूयात काय म्हणाले आहेत नेटकरी या तरुणीबद्दल…

पाकिस्तानी संघापेक्षा हिचे सातत्य जास्त आहे

हे गाणे तुझ्यासाठीच आहे का?

आज ती पुन्हा आली

पंडीत बोलवा

हिला पाहून काही होत नसेल तर…

कॅमेरामन तिच्या मागे लागलेत

सामना तर भारतच जिंकेल पण…

तुझ्या दु:खाचे कारण…

यासाठी सामन्याची वाट पाहतोय