News Flash

भावाला का मारलं? आईला मुलगी समजावतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल

तुम्हाला देखील हा व्हिडिओ पाहून हसू आल्या शिवाय राहणार नाही.

भावंडामधील नातं हे अतिशय सुंदर गोष्ट असते. ते एकमेकांवर जीवपाड प्रेम करतात, एकमेकांना जीवापाड जपतात, सर्व गुपीतं एकमेकांस सांगतात व एकमेकांशी भांडतात देखील. बहीण व भावाच्या नात्याच्या असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील एक छोटी मुलगी तिच्या आईला समजावत आहे की, तिने तिच्या भावाला का मारलं. ही चिमुकली ज्या प्रमाणे आईसमोर आपले मुद्दे मांडून आईला ते पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे, ते पाहून प्रत्येकास हसू फुटत आहे.

हा व्हिडिओ राहशीम या व्यक्तीने ट्विटरवर शेअर केला आहे. ५३ सेंकदाच्या या व्हिडिओत सुरूवातीस स्क्रीनवर लिहिले आहे की, तिने तिच्या भावाला का मारलं हे ती सांगण्याचा प्रयत्न करत आहे. नंतर या व्हिडिओतील छोटी मुलगी तिच्या चिडलेल्या आईला शांत करण्यासाठी म्हणते की, ‘आई, मला मारू नकोस ठीक आहे. असे सांगताना ती दोन्ही हात वर करते. त्यानंतर ती आईला समजवण्याचा प्रयत्न करू लागते की, नेमकं तिने तिच्या भावाला का मारलं जे पाहताना कोणालाही हसू आवरणं कठीण होतं.

ती पुढे म्हणते. आई रागावू नकोस, मलाचीने मला मारलं आणि त्यानंतर मी त्याला मारायला सुरूवात केली. कारण, तो मला एकटं सोडत नव्हता. मला एकटं राहयचं होत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडओवर भन्नाट कमेंट येत आहेत. अनेकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. हजारो जणांनी हा व्हिडिओ पाहिल्याचे दिसून आले आहे. शिवाय, अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया देखील नोंदवल्या आहेत.

एका जणाने या मुलीचा व्हिडिओ पाहून व तिची आईला समजवण्याची पद्धत पाहून, ही मुलगी भविष्यात मोठी वकील बनेल असं देखील म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 12:06 pm

Web Title: why did you beat your brother the video goes viral of the girl who explaining to her mother msr 87
Next Stories
1 याला म्हणतात Dream Job : बिस्किट खाण्यासाठी महिन्याला मिळणार ३ लाख ३३ हजार पगार
2 पेरुच्या वाळवंटामध्ये सापडली २२०० वर्षांपूर्वीची १२१ फुटांची ‘मांजर’
3 VIDEO: मराठी महिलेचं धाडस! ६८ वर्षीय आजीबाईंचा वैष्णोदेवीसाठी २२०० किमी सायकल प्रवास
Just Now!
X