News Flash

“हिटलर दिसतोय मग चर्चिल का नाही?”; ब्रिटनचे माजी पंतप्रधान गुगलवरुन गायब

विन्स्टन चर्चिल यांचा फोटो का झाला गायब?

गुगल सर्च रिझल्टमधून ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा फोटो रहस्यमयरित्या गायब झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ब्रिटनच्या इतर सर्व राष्ट्रपतींचे फोटो दिसत आहेत. फक्त चर्चिल यांचाच फोटो गायब आहे. या अजब प्रकारामागील खरं कारण नेटकऱ्यांनी गुगलला विचारण्यास सुरुवात केली आहे. मात्र गुगलने याबाबत अद्याप कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

रविवारी एका युझरने ब्रिटनच्या पंतप्रधानांची यादी सर्च केली होती. त्यावेळी ही चकित करणारी बाब त्याच्या लक्षात आली. त्याने ट्विट करुन हा प्रकार गुगला सांगितला. आश्चर्याची बाब म्हणजे गुगलकडून यावर प्रतिक्रिया येण्यापूर्वी इतर नेटकऱ्यांनी चर्चिल यांचे स्क्रिन शॉट व्हायरल करण्यास सुरुवात केली. अडॉल्फ हिटलर आणि जोसेफ स्टॅलिन यांचे फोटो दिसतायत मग चर्चिल यांचा फोटो का दिसत नाही? असा प्रश्न काही नेटकऱ्यांनी विचारला आहे. अमेरिकेतील काही सायबर तज्ज्ञांच्या मते गुगल सर्च इंजिनमध्ये आलेल्या ग्लिजमुळे हा प्रकार घडला आहे.

कोण होते विन्स्टन चर्चिल?

विन्स्टन चर्चिल यांचा जन्म ३० नोव्हेंबर १८७४ साली झाला होता. त्यांचं पूर्ण नाव विन्स्टन लेनर्ड स्पेन्सर चर्चिल असं होतं. राजकारणात येण्यापूर्वी ते पत्रकार व साहित्यिक होते. एक थोर युद्धनेता म्हणून त्यांचे ब्रिटनमध्ये कौतुक केले जाते. युरोपला प्रगतीपथावर नेणाऱ्या २५ महान व्यक्तीमत्वांमध्ये त्यांची गणना केली जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 12:36 pm

Web Title: why photos of winston churchill disappeared from google mppg 94
Next Stories
1 Video: ‘तुमची मुलं आम्हाला बघतायत’; दरोदारी जाऊन ‘पॉर्न स्टार्स’च देत आहेत पालकांना माहिती
2 ट्विटरवरील कव्हर फोटो आणि सुशांतच्या मृत्यूचं कनेक्शन?; आत्महत्येनंतर चर्चेत आलं ‘ते’ चित्र
3 कहर… गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी क्वारंटाइन सेंटरमधून पळाले, येताना गांजा-दारु घेऊन आले
Just Now!
X