सध्या सोशल नेटवर्किंगवर अनेक सरकारी आणि प्रशासकीय संस्था करोनासंदर्भातील जगजागृती करत आहेत. अगदी सरकारी खात्यांपासून ते पोलीस खात्यांपर्यंत सर्वच अकाऊंटवरुन वेगवेगळ्या पद्धतीने करोनासंदर्भात घ्यायची काळजी, सल्ले आणि इतर इशारे सर्व सामान्यांपर्यंत पोहचवण्याचं काम केलं जात आहे. असेच एक ट्विट सध्या पुन्हा चर्चेत आलं आहे. हे ट्विट केलं आहे उत्तर प्रदेश पोलिसांनी.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करोनासंदर्भातील जनजागृती करण्यासाठी एक भन्नाट व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ शोले या हिंदी चित्रपटातील आहे. २२ सेकंदांचा हा व्हिडीओ शेअर करत पोलिसांनी गब्बरला का शिक्षा करण्यात आली असावी असा प्रश्न फॉलोअर्सला विचारला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता अमजद खान यांनी साकरलेला गब्बर आणि संजीव कुमार यांनी साकारलेल्या ठाकूर बलदेव सिंगवर आधारित दोन सीन पोस्ट करण्यात आलेत. सुरुवातील गब्बर आक् थू… करत आपल्या टिपिकल स्टाइलमध्ये थुंकताना दिसतो. त्यानंतर ठाकूर गब्बरचा पाठलाग करतो आणि शेवटी त्याच्या गळ्याभोवती आपल्या हाताचा फास आवळताना दिसतो.

व्हिडीओच्या शेवटी पोलिसांनी सर्वांना एक इशारा दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर थुंकणे हा कायद्याने गुन्हा आहे. तसेच असं केल्याने करोनाचा संसर्ग होण्याची भीती असते असं या इशाऱ्यामध्ये सांगण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून पाच हजारांहून अधिक जणांनी तो शेअर केला आहे. अनेकांनी यावर मजेदार प्रतिक्रियाही दिल्यात. पाहूयात काही मोजक्या प्रतिक्रिया.

१) बरं…

२) गब्बरची प्रतिक्रिया

३) अभिनंदन

४) कानपूरमधले लोकं

५) कानपूरच्या लोकांची पहिली प्रतिक्रिया

एकंदरितच नेटकऱ्यांना हा शोलेमधील युपी पोलिसांनी दिलेला करोना ट्विस्ट चांगलाच आवडल्याचं चित्र दिसत आहे.