News Flash

April Fool’s Day 2018 : काय आहे ‘एप्रिल फुल’ची गोष्ट?

एप्रिल फुल, डब्बा गुल!

एक एप्रिल तारिख आली रे आली की आपल्या डोक्यात पहिला विचार येतो तो आज कोणाला मुर्ख बनवायचे बाबा? एप्रिल फूल म्हणजे समोरच्याला मुर्ख बनवण्याचा हा दिवस. तसा हा दिवस नेहमीसारखाच. यात काही वेगळे नाही पण थोडीशी गंमत जोडली असते. तसे एरव्ही काही लोक एकमेकांना मूर्ख बनवताच पण हा खास ‘फुल’ म्हणजे मूर्खांचा दिवस म्हणूनच ओळखला जातो. एखाद्याला मुर्ख बनवले की ‘एप्रिल फुल डब्बा गुल’ म्हणत त्याची लहानपणी खोड काढलेल्याचेही आठवत असेच. पण तुम्हाला माहितीय नेमकी ही संकल्पना कधी सुरू झाली आणि काय आहे ‘एप्रिल फुल’ गोष्ट ?

तसं पाहायला तर ती ही शेकडो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे १५ व्या शतकातली वगैरे. १५८२ मध्ये पोप तेरावे ग्रेगरी यांनी ज्युलिअन दिनदर्शिका बदलून ग्रेगरिअन दिनदर्शिका आणली. आता गोष्ट अशी होती की याआधी सगळेच जण १ एप्रिलला नववर्ष साजरे करायचे पण पोपच्या नव्या दिनदर्शिकेने सारा घोळच झाला म्हणायचा. या नव्या दिनदर्शिकेनुसार आता सगळ्यांनी १ एप्रिल ऐवजी १ जानेवारीला नववर्ष साजरं करावं असा आदेश काढण्यात आला. आता वर्षानुवर्ष एप्रिलमध्ये नववर्ष साजरे करण्याची परंपरा आपली. तिथे रातोरात फर्मान काढून जर कोणी आपले सणच बदलले तर काय होणार हे वेगळं सांगायला नको. साहजिकच अनेकांना ते काही रुचलं नाही. त्यामुळे लोकांनी याला कडाडून विरोध केलाच, आंदोलन वगैरे झाली ती वेगळीच. पण हळूहळू लोकांना मात्र तो निर्णय मान्य करावाच लागला, पण काही असेही लोक होते ज्यांनी मात्र १ जानेवारीला नववर्ष साजरं करण्यास ठाम नकार दिलाचय आम्ही १ एप्रिललाच नववर्ष साजरं करू या निर्णयावर ते ठाम राहिले. त्यामुळे या सगळ्यांनाचा मुर्ख ठरवण्यात आले. तेव्हापासून १ एप्रिल हा दिवस मुर्खाचा दिवस म्हणजे ‘एप्रिल फुल’ डे साजरा करण्यात येऊ लागला. फ्रान्समधली ही गोष्ट युरोपभर पसरली आणि त्यानंतर ‘एप्रिल फुल’ साजरा करण्यात येऊ लागला अशीही ही गोष्ट सांगितली जाते.

एप्रिल फुलबद्दल आणखी एक गोष्ट फारच मजेशीर आहे. कॉन्सन्टाइन द ग्रेट याच्या काळात काही विदूषक राजदरबारात गेले. आपण या राजपेक्षाही चांगला कारभार करू शकतो असे त्यांचे मत पडले. आता उदार राजांनी एक दिवसासाठी गंमत म्हणून त्यातल्या एका विदूषकाच्या हाती राज्यकारभार सोपवला, तर एका विदूषकाने फर्मानच काढले. वर्षातला एक दिवस सगळ्या जनतेने मुर्खासारखे वागायचे आणि विदूषकासारखे चाळे करायचे. विदूषकाचा हेतू एवढाच की इतरांना हसवणं किती कठीण असतं हे लोकांना दाखवून द्यावं आणि तेव्हा पासून ‘फुल डे’ साजरा करण्याची जणू परंपराच सुरु झाली. तशा एप्रिल फुल डेच्या अनेक गोष्टी आहेत पण यातल्या या दोन तर खूपच गंमतीशीर आहेत नाही का!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2018 11:49 am

Web Title: why we celebrate april fool day 2018 history and origin of this day
Next Stories
1 April Fool Day 2018: इतरांना April Fool करण्याच्या काही धमाल ट्रिक्स
2 १६ दिवसांच्या बालकाला घेऊन माकड फरार, वन विभागाकडून कसून शोध
3 भरकटलेलं चिनी स्पेस स्टेशन पृथ्वीवर कोसळणार, खगोलतज्ज्ञांमध्ये खळबळ
Just Now!
X