सरकारी योजनांबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत माध्यमांद्वारे माहिती दिली जात असते. पण, सध्या एका युट्यूब व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की, केंद्र सरकारने ‘विधवा महिला समृद्धी योजना’ आणली असून या योजनेअंतर्गत केंद्र सरकार विधवा महिलांना 5 लाख रुपये रोख आणि  एक शिलाई मशिन मोफत देत आहे. अशात सामान्य लोकांसाठी हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की खरंच सरकारने अशाप्रकारची कोणती योजना आणली आहे का? जर सरकारने अशी कोणती योजना आणली नसेल तर मग व्हायरल होणाऱ्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे?

काय आहे सत्य ?-
व्हायरल होणाऱ्या युट्यूब व्हिडिओमध्ये जो दावा करण्यात आला आहे तो पूर्णतः खोटा असून केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाहीये. सरकारच्या पत्रसूचना विभागाने (पीआयबी) याबद्दल खुलासा केला आहे. ‘पीआयबी फॅक्ट चेक’ने लोकांना अशाप्रकारच्या खोट्या व फेक बातम्यांपासून सावध रहाण्याचा इशारा दिला आहे.

Women officers and employees are fully responsible for voting stations where number of women voters is more than men
महिलांच्या हाती मतदान केंद्राची दोरी…
onion, farmers
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या केंद्र सरकारचा निर्णय
public sector enterprises disinvestment in fy 24
निर्गुंतवणूक लक्ष्याची सरकारला पुन्हा हुलकावणी! सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून १६,५०७ कोटींचा लाभ
Government, Over Rs 15 thousand Crore, Dividend, Public Sector Banks, Receive, finance, financial knowledge, financial year end, marathi news
सरकारी बँकांकडून केंद्राला १५,००० कोटींचा लाभांश शक्य


पीआयबी फॅक्ट चेक :-
पीआयबी फॅक्ट चेक केंद्र सरकारच्या पॉलिसी / योजना / विभाग / मंत्रालयांविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी कार्य करते. सरकारशी संबंधित कोणतीही बातमी सत्य किंवा असत्य आहे हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते. कोणीही PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा युआरएल व्हॉट्सअप नंबर 918799711259 वर पाठवू शकतं. याशिवाय, pibfactcheck@gmail.com या ईमेल आयडीवर मेल देखील करु शकतात.