26 January 2020

News Flash

बिहारचा रँचो; कारपासून बनवून टाकलं हेलिकॉप्टर

त्याने आपली पूर्ण बचत या प्रयोगावर खर्च केली आहे.

बिहारमधील एका शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या २३ वर्षीय तरूणाने स्वत:ची कार हेलिकॉप्टरमध्ये रुपांतरित केली आहे. मिथिलेश कुमार प्रसाद असं या तरुणाचं नाव असून तो सरण जिल्ह्यातील शार्मी गावचा रहिवासी आहे. वैमानिक बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलेल्या मिथिलेशने कारपासून हेलिकॉप्टर बनवत आपल्या स्वप्नाला पंख दिले आहेत.

मिथिलेश कुमार प्रसादने आपली पूर्ण बचत या प्रयोगावर खर्च केली आहे. नोव्हेंबर २०१८मध्ये त्याने एक नॅनो कार विकत घेत या प्रयोगाला सुरूवात केली होती. सात महिन्याच्या अथक परिश्रमानंतर मिथिलेशचं स्वप्न सत्यात उतरलं.

‘अद्याप काही तांत्रिक बाजूंवर काम सुरू आहे. ते यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर हेलिकॉप्टर उड्डाण भरेल, असं मिथिलेशनं प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.’

 

View this post on Instagram

 

If you don’t know how to fly a helicopter, just make your car look like one! (@ruptly)

A post shared by UNILAD Tech (@uniladtech) on

मिथिलेशचं लहानपणापासून वैमानिक होण्याचं स्वप्न होतं. पण घरातील आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्याचे स्वप्न अपूर्णच राहिलं. मिथिलेशने गुजरातमध्ये पाईपलाईन फिटरचे काम करत पैशांची बचत केली. कारचे हेलिकॉप्टर तयार करण्यासाठी मिथिलेशला भाऊ सुजीतने मदत केली. हेलिकॉप्टरचा आतील भाग लोखांडापासून तयार केला आहे. तर बाहेरभागासाठी अॅल्युमिनियमचा वापर करण्यात आला आहे. टेल रोटर, मुख्य रोटर ब्लेड, टेल बूम, रोटर मास्ट आणि कॉकपिट तयार केलं आहे.

First Published on August 9, 2019 1:47 pm

Web Title: with a dream to become pilot bihar man turns his car into helicopter nck 90
Next Stories
1 Video : “एखाद्याला ठार मारण्याचे संस्कार माझ्यावर नाहीत”, ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’चा नवा ट्रेलर प्रदर्शित
2 VIDEO: धोनीसमोर काश्मीरी तरुणांनी दिल्या ‘बूम बूम आफ्रिदी’च्या घोषणा
3 एकदम फिल्मी! पोलीस महिलेनं केलं गँगस्टरशी लग्न
Just Now!
X