News Flash

VIDEO : थेट विमानात जाण्याचा मार्ग समजून ‘ती’ कन्व्हेअर बेल्टवरच बसली

पाहा काय झालं त्यानंतर ?

VIDEO : थेट विमानात जाण्याचा मार्ग समजून ‘ती’ कन्व्हेअर बेल्टवरच बसली

अनेकदा आपण प्रवासादरम्यान किंवा अन्य ठिकाणी कधी ना कधी कोणाला ना कोणाला काही अजब गोष्टी करताना पाहिलंच असेल. अनेकदा विमानाने पहिल्यांदा प्रवास करणाऱ्यांसोबतही काही ना काही मजेदार किस्से घडत असतात. काही क्षण खरंच कायम आठवणीत राहणारे आणि मजेदार असतात. असाच एक प्रकार इस्तांबुल विमानतळावर घडला. विमानतळावर सामानासाठी असलेल्या कन्व्हेअर बेल्टमध्ये घुसण्याचा प्रयत्न एका महिलेने केल्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत एक महिला विमानतळावर सामानासाठी असलेल्या कन्व्हेअर बेल्टमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे. दरम्यान, यावरून आपण थेट विमानापर्यंत पोहोचू असा समज झाल्याने त्या महिलेने कन्व्हेअर बेल्टमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. सदर महिला पहिल्यांदाच विमानाने प्रवास करत असल्याची माहिती काही रिपोर्ट्समधून समोर आली आहे.

सदर महिला चेक इन काऊंटरशेजारी असलेल्या सामानांच्या वजनासाठी असलेल्या जागेवर चढताना या व्हिडीओत दिसत आहे. तसेच त्यानंतर कन्व्हेअर बेल्ट सुरू झाल्यामुळे त्या महिलेचा तोल जाऊन ती पडते. सदर घटनेनंतर काऊंटरवर असलेले कर्मचारीही गोंधळात पडल्याचे दिसत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2019 2:45 pm

Web Title: woman climbs conveyor belt thinking take her directly to aircraft istanbul airport jud 87
Next Stories
1 कुणाकडून ड्रग्स हरवलेत का? परत पाहिजे असल्यास त्वरित संपर्क करा अन्यथा… : राजस्थान पोलीस
2 …म्हणून त्याने जखमी पक्ष्याला उबर टॅक्सी बुक करुन दिली!
3 ‘चूक तुमची नाही, निकाल इंग्रजीत होता’, गिरिराज सिंहांचं पाकिस्तानला मजेदार प्रत्युत्तर
Just Now!
X