तुम्ही आजपर्यंत ‘हात दाखवून अवलक्षण’ हा वाक्यप्रचार ऐकला असेल. मात्र, अमेरिकेतील एका महिलेच्याबाबतीत सध्या जो काही प्रकार घडत आहे ते पाहता, ‘बोट दाखवून अवलक्षण’ असा नवा वाक्यप्रचार अस्तित्त्वात आल्यास नवल वाटणार नाही. या महिलेने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाड्यांचा ताफा रस्त्यावरून जात असताना केलेली कृती सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. या सगळ्यानंतर संबंधित महिलेला आपली नोकरी गमवावी लागली आहे. मात्र, थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंगा घेण्याची हिंमत दाखवल्यामुळे ती ‘ऑनलाइन सेन्सेशन’ ठरली. लोकशाहीचे पुरस्कर्ते असणाऱ्या युजर्सने तिच्या हिंमतीची दाद दिली आहे.

खूशखबर! २०१८ मध्येही कर्मचाऱ्यांवर सुट्ट्यांचा ‘पाऊस’

अमेरिकेतल्या सर्वात बलाढ्य व्यक्तीचा ताफा रस्त्यावरून जात असताना या महिलेनं मधलं बोट दाखवून एकप्रकारे या ताफ्याचा अपमान केला. ती जितक्या सहज आली तितक्याच सहज निघूनही गेली. तिची ही कृती ताफ्यातील एका फोटोग्राफरनं टिपली. बघता बघता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. एवढी हिंमत दाखवणारी ही महिला सोशल मीडियावरची ‘स्टार’ झाली.

Viral Video : ‘या’ तरुणाच्या हिंमतीची दाद दिलीच पाहिजे

पण सोशल मीडियावर कौतुकाची थाप मिळवून देणाऱ्या ‘त्या’ कृतीसाठी या महिलेला कंपनीने थेट ‘नारळ’ दिला आहे. जुली ब्रिस्कमॅन असं या महिलेच नाव असून ती एका सरकारी कंपनीत काम करते. असभ्य वर्तन केल्याप्रकरणी तिला कंपनीतून काढून टाकल्याचे समजत आहे. जुलीने ‘हफिंग्टन पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. सोशल मीडियावर ताफ्याकडे पाहून असभ्य वर्तन करणारी महिला आपणच असल्याचे तिने कंपनीच्या एचआरकडे कबूल केले होते. पण तिच्या असभ्य वागण्यामुळे कंपनीची प्रतिमा डागाळली, असं सांगत तिला कंपनीतून काढून टाकण्यात आले.

Viral Video : ‘वेडिंग फोटोग्राफी’ करताय?, मग ‘या’ जोडप्यासारखी चूक करू नका