30 September 2020

News Flash

Viral : घरात कित्येक महिन्यांपासून राहत होता पाहुणा, अन् तिला माहितही नव्हते

आयत्या घरात घरोबा!

तरूणींच्या घरातील पोटमाळ्यात कित्येक दिवस हा माणूस राहात होता

तुम्हाला अशोक सराफ, सचिन आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा ‘आयत्या घरात घरोबा’ हा चित्रपट आठतोय का? घराचे मालक जेव्हा परदेशात जायचे तेव्हा अशोक सराफ सहा महिने एका बंगल्यात राहायचे. घरातल्यांना त्यांच्या एकंदर वास्तव्याबद्दल या कानाची त्या कानालाही खबर व्हायची नाही, तर हा चित्रपट आता आठवण्याचं कारण म्हणजे व्हर्जिनियातल्या एका तरूणीबाबात असं काहीसं घडलं. या तरूणींच्या घरातील पोटमाळ्यात कित्येक दिवस एक माणूस राहात होता पण तिला मात्र याची जराही कल्पना नव्हती. आता त्याचं हे बिंग फुटलं कसं असा प्रश्न तुम्हाला असेल.

तर मध्यरात्री या तरूणीला काही विचित्र आवाज येऊ लागले. पोटमाळ्याच्या दिशेने तिला हे आवाज ऐकू येत होते. गेल्या कित्येक महिन्यांपासून ती पोटमाळ्याकडे फिरकली ही नव्हती. मग हे आवाज कुठून येतात याची भीती तिला होती. शेवटी तिने दीड वाजता पोलिसांना फोन करून बोलावून घेतले तेव्हा तिच्या लक्षात आलं की त्या घरात ती एकटीच नव्हती तर तिथे आणखी एक माणूस लपून राहत होता. हा माणूस स्वत: बेघर होता. तेव्हा त्याने लपून तिच्या घरी राहण्याचं ठरवलं. पण ऐनवेळी त्याचं बिंग फुटलं. या पोटमाळ्यात त्याचं सामान होतंच पण त्याने झोपायचीही व्यवस्था केली होती. हा बऱ्याच दिवसांपासून इथे राहत असावा असा निष्कर्ष पोलिसांनी काढला. अशा अनेक घरांत घर मालकांच्या डोळ्यात धूळ फेकून कित्येक बेघर राहतात असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2017 11:00 am

Web Title: woman discovers man who is living in her attic from many year
Next Stories
1 Viral Video : सुंदर तरुणीकडे रोखून बघणं त्याला पडलं महागात
2 Viral Video : मेलेलं पिल्लू कवटाळून ती आई कित्येक दिवस रडत होती
3 मराठमोळ्या ‘सोनू’च्या गाण्याचं पाकिस्तानी व्हर्जन ऐकलंत का ?
Just Now!
X